''बायो-बबल जनावऱ्यांच्या पिंजऱ्यासारखं वाटते!''

क्रिक्रेटपटूंना बायो-बबलमध्ये कधी-कधी सर्कस मधल्या पिंजऱ्या सारखे फिल होते.
''बायो-बबल जनावऱ्यांच्या पिंजऱ्यासारखं वाटते!''
तरबेज शम्सीTwitter/ @shamsi90

कोरोना साथीच्या (Coronavirus) आजारामुळे खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. बायो बबलमध्ये त्यांना बराच वेळ घालवावा लागतो. यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. खेळाडू वेळोवेळी यामुळे होणार्‍या त्रासांबद्दल सांगतात. आता टी-20 मध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू तरबेज शम्सीने (Tabraiz Shamsi) याबद्दल मोठे विधान केले आहे. तो म्हणाले की, क्रिक्रेटपटूंना बायो-बबलमध्ये कधी-कधी सर्कसितल्या पिंजऱ्या सारखे फिल होते.

अलीकडे, इंग्लंडचे तीन क्रिकेटपटू आणि त्यांच्या चार सहाय्यक सदस्यांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले होते. यानंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) बायो-बबलमधून सूट दिल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला होता. इतकेच नव्हे तर टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि इंग्लंड दौर्‍यावर गेलेले सहाय्यक कर्मचारी दयानंद गुरणे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.

तरबेज शम्सी
T-20 World Cup: पहिले 6 सामने 'या' देशात खेळवले जाणार

दरम्यान, शम्सीने ट्वीट करून म्हटले आहे की, 'या गोष्टींचा आपल्यावर, आपल्या कुटूंबावर आणि क्रिकेटच्या बाहेर आमच्या जीवनावर होणारा परिणाम सर्वांना खरोखरच माहित आहे असे मला वाटत नाही. कधीकधी असे वाटते की आम्ही पिंजरा लावलेले सर्कसितील प्राणी आहोत, जेव्हा गर्दीचे मनोरंजन करण्याची वेळ येते तेव्हाच त्यांना बाहेर नेले जाते''.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खेळाडूंना बायो-बबल मधून सूट देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. स्थानिक माध्यामांच्या मते हॅरिसन म्हणाले, “खेळाडू ज्या टूर्नामेंटमध्ये खेळत आहेत त्यात खेळण्याबद्दल खेळाडूंना छान वाटावे, मग ते भारत विरुद्ध कसोटी मालिका असो, काउन्टी क्रिकेट किंवा आरएल 501 असो. घर असो किंवा व्यावसायिक क्रिकेट, आपलं आयुष्य चांगलं चाललं आहे असं त्यांना वाटावं अशी आमची इच्छा आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com