Mohammed Shami News: मोहम्मद शमीला कोर्टाचा दणका! पत्नीला महिन्याला द्यावे लागणार 'इतके' रुपये

पत्नी हसीन जहाँला द्यावे लागणार महिन्याला 'इतकी' पोटगी
Mohammed Shami
Mohammed ShamiSaam Tv

Mohammed Shami News : कोलकाता न्यायालयाने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्याची विभक्त पत्नी हसीन जहाँला महिन्याला 1 लाख 30 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहे.या 1 लाख 30 हजार रुपयांपैकी 50,000 रुपये हसीन जहाँसाठी वैयक्तिक पोटगी असेल आणि उर्वरित 80,000 रुपये त्यांच्या मुलीच्या देखभालीसाठी असतील.

Mohammed Shami
Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांची घेणार भेट

2018 मध्ये, हसीन जहाँने महिन्याला 10 लाख रुपयांच्या पोटगीची (Alimony)मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. यामध्ये 7 लाख रुपये हे वैयक्तिक खर्च तर मुलाच्या संगोपनासाठी 3 लाख रुपये अशी विभागणी केली होती. ह

हसीन यांचे वकील मृगांका मिस्त्रीने न्यायलयाला विनंती केली होती की, 2021-22 या आर्थिक वर्षाात शमीच्या (Mohammed Shami) आयकर रिर्टननुसार, वार्षिक उत्पन्न हे 7 कोटींपेक्षा अधिक होतं. याच आधारावर 10 लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी करण्यात आली होती.

Mohammed Shami
Mahavitran News : शॉक लागून तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; महावितरणने घेतली गंभीर दखल

शमीच्या वकीलचा दावा

न्यायालयात शमीची बाजू वकील सेलिम रहमान यांनी मांडली. हसीन स्वत: मॉडेल म्हणून काम करत असून ठराविक रक्कम मिळवत होती. त्यामुळे पोटगी म्हणून मोठी रक्कम मागण योग्य नाही. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर शमीने 1 लाख 30 रुपये मासिक पोटगी देण्याचा निर्णय न्यायालयाने सोमवारी घेतला. हसीन जहाँने दावा केला की मासिक पोटगीची रक्कम जास्त असती तर तिला दिलासा मिळाला असता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com