T20 World Cup 2022: ICC चा मोठा निर्णय; कोविड बाधित खेळाडूही खेळू शकणार सामने

या निर्णयावर क्रिकेट विश्वातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
T20 World CUp
T20 World CUpSaam TV

नवी दिल्ली: रविवारी म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात झाली असून आयसीसीने (ICC) मोठा निर्णय घेतला आहे. सध्या स्पर्धेत पहिल्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. आयसीसीच्या या निर्णयानुसार, आता कोरोना (Corona) बाधित खेळाडूंनाही वर्ल्ड कप खेळण्यासाठी परवागनी देण्यात आली आहे. (sports News In Marathi)

T20 World CUp
Andheri East Bypoll: अंधेरीची पोटनिवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता; सागर बंगल्यावरील बैठकत चर्चा

ऑस्ट्रेलियन सरकारनेही या आठवड्यात नियमात बदल करण्यात आले आहे. त्यांनी कोरोना बाधित लोकांसाठी आयसोलेशन रद्द केले आहे. त्यामुळे आयसीसीनेही हा मोठा निर्णय घेतला.ऑस्ट्रेलियन सरकारने या आठवड्याच्या सुरुवातीला विलिगीकरण बंद केलं होतं. आता याच मुद्द्यावरून आयसीसीनेही विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूंसाठीही हाच निर्णय घेतला होता.

साम्यादरम्यान कोणत्याही खेळाडूची कोविड-19 चाचणी होणार नाही. जर एखाद्या खेळाडूला कोरोना झाला तर त्याला सामन्यामध्ये खेळवायचं की विश्रांती द्यायची याबाबतचा निर्णय संघ व्यवस्थापन आणि त्यांच्या डॉक्टरांना घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता या निर्णयावर क्रिकेट विश्वातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com