संदेश येताच नाणेफेक करण्यापूर्वी न्यूझीलंडची पाकिस्तानात माघार

new zealand have called off their limited-overs tour of Pakistan citing security concerns
new zealand have called off their limited-overs tour of Pakistan citing security concerns
Summary

पहिला एकदिवसीय सामना आज (शुक्रवार) दुपारी तीन पासून सुरु हाेणार हाेता. रावळपिंडीत नाणेफेक होण्यापूर्वी सामना रद्द झाल्याने क्रिकेटप्रेमींची निराशा झाली आहे.

रावळपिंडी : तीन एकदिवसीय आणि पाच टी -20 सामन्यांसाठी तब्बल 18 वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौ-यावर आला आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने त्यांचा पाकिस्तानचा मर्यादित षटकांचा दौरा रद्द केला आहे. या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बाेर्ड नाराज झाले आहे.

आज पासून रावळपिंडी येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यास प्रारंभ होणार होता मात्र सकाळपासून न्यूझीलंड संघ हॉटेलमध्ये राहिला. एका ही खेळाडूाने सामन्यासाठी तयारी केली नसल्याचे दिसून आले. दरम्यान प्रेक्षकांना देखील स्टेडियममध्ये प्रवेश दिला गेला नाही. cricket-new-zealand-call-off-pakistan-tour-minutes-before-start-of-first-odi-sml80

न्यूझीलंड क्रिकेट समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार येथे धोक्यात वाढ झाल्यानंतर आणि सुरक्षा सल्लागारांकडून सल्ला दिल्याने दाैरा साेडण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमधील न्यूझीलंड संघ आता देश सोडण्याच्या तयारी करु लागला आहे.

new zealand have called off their limited-overs tour of Pakistan citing security concerns
सुटीतील पर्यटनासाठी जाणून घ्या १७ hoilday special trains

न्यूझीलंड क्रिकेट समितीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाईट NZC chief executive David White यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यजमान पाकिस्तान क्रिकेट बाेर्डसाठी (पीसीबी) pakistan cricket board आमचा निर्णय धक्का असू शकेल परंतु खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरि महत्वाची आहे आणि आम्हांला विश्वास आहे की हा एकमेव जबाबदार पर्याय आहे."

न्यूझीलंड क्रिकेट समितीच्या निर्णायावर पीसीबी नाखुश झाली आहे. पीसीबीच्या म्हणण्यानूसार हा एकतर्फी निर्णय आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आम्हांला कळवले की त्यांना सुरक्षितेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यांच्या एकतर्फी निर्णयामुऴे मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे पीसीबीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पीसीबी आणि पाकिस्तान सरकारने स्पर्धेसाठी आलेल्या सर्व संघांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डालाही तसे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून त्यांना आमच्याकडे सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा असून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेचा धोका नसल्याचे सांगितले आहे असे पीसीबीने म्हटलं आहे.

न्यूझीलंड संघासमवेत आलेले सुरक्षा अधिकारी पाकिस्तान सरकारने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल समाधानी आहेत. न्यूझीलंड संघ 11 सप्टेंबर रोजी इस्लामाबादमध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी सरावचे तीन सत्र पार पाडले. दोन्ही संघ एकाच हॉटेलमध्ये थांबले आहेत. जे सर्व सुरक्षा प्रोटोकॉलसह स्टेडियमपासून सुमारे 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. new zealand have called off their limited-overs tour of Pakistan citing security concerns

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com