Cricket News: मराठमोळ्या पोरीची WPLमध्ये धुवांधार खेळी! स्पॉन्सर नसल्याने बॅटवर लिहिलं धोनीचं नाव अन् कमालच केली

WPL 2023: किरणने या सामन्यात 43 चेंडूत 53 धावांची धडाकेबाज खेळी केली.
Kiran Navgire
Kiran NavgireSaam TV

WPL 2023 : वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात संघ अक्षरश: धावांचा पाऊस पाडत आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्वच मॅच हाय स्कोरर झाल्या आहेत. कालच्या यूपी वॉरिअर्स आणि गुजरात जायंट्सच्या अटीतटीच्या सामन्यात यूपीने बाजी मारली. यूपीच्या विजयात मराठमोळ्या किरण नवगिरेची महत्त्वाची भूमिका होती. किरणने या सामन्यात 43 चेंडूत 53 धावांची धडाकेबाज खेळी केली. (Cricket News)

किरण नवगिरे ही टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मोठी फॅन आहे. महाराष्ट्रातील सोलापूर येथे जन्मलेली किरण नवगिरेला यूपी वॉरियर्सने लिलावात 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात समाविष्ट करुन घेतले. (Latest Sports News)

Kiran Navgire
DC vs RCB: शेफाली वर्माच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर दिल्लीचा दिमाखदार विजय! आरसीबीवर 60 धावांनी मात
Kiran Navgire
Kiran NavgireKiran Navgire

गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात किरणला यूपीकडून खेळण्याची संधी मिळाली. तिच्या बॅटवर कुणीही स्पॉन्सर नव्हते. पण तिने MSD 07 असं लिहिलं होतं. WPL सुरू होण्यापूर्वी जिओ सिनेमाशी बोलताना किरण म्हणाली होती की, ती धोनीची मोठी फॅन आहे. भारताने 2011 चा पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला तेव्हापासून ती धोनीला फॉलो करते आहे. महिला क्रिकेटबाबत तिला माहितीही नव्हती.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात किरणने अर्धशतक झळकावले.यूपीच्या तीन विकेट 20 धावांत पडल्या होत्या. यानंतर किरणने दीप्ती शर्मा (11) सोबत चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली आणि संघाचा विजय सोपा केला.

किरणने भारतासाठी 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. भारताच्या डोमेस्टिक सीनियर महिला टी20 ट्रॉफीमध्ये नागालँडकडून खेळताना तिने 162 धावांची खेळीही केली आहे. T20 क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय महिला आणि पुरुषाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com