Cricket February Schedule: टीम इंडियाचं फेब्रुवारी महिन्यातील सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक, क्रिकेट चाहत्यांनी तर चेक कराच

फेब्रुवारीमध्ये टीम इंडियासमोर अनेक आव्हाने आहेत, ज्यात न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका, ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका यांचा समावेश आहे.
Team India
Team IndiaSaam Tv

Cricket News : क्रिकेट अनेकांच्या आवडीचा खेळ आहे. भारतात तर क्रिकेटप्रेमींची संख्या मोठी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते नेहमीच्या टीम इंडियाच्या सामन्यांची प्रतीक्षा असते. टीम इंडियाची नवीन वर्षात सुरुवात चांगली झाली आहे. आता फेब्रुवारी महिन्यात टीम इंडियाचं टाईमटेबल कसं असेल यावर एक नजर टाकूया.

भारतीय खेळाडू काही काळापासून सतत क्रिकेट खेळत आहेत आणि फेब्रुवारी महिन्यातही हे कायम राहणार आहे. फेब्रुवारीमध्ये टीम इंडियासमोर अनेक आव्हाने आहेत, ज्यात न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका, ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका यांचा समावेश आहे. (Team India)

Team India
IND vs NZ T20 : तिसऱ्या टी-२० सामन्याआधी हार्दिकने डाव टाकला; टीम इंडियात होणार दोन मोठे बदल

केवळ पुरुष संघच नाही तर महिला संघाचीही या महिन्यात चांगला खेळ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण महिला टी-२० विश्वचषक १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अलीकडेच महिला संघाने अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकला आहे, अशा परिस्थितीत चाहत्यांच्या इथून अपेक्षा वाढल्या आहेत.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक

  • 1 फेब्रुवारी - T20 विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद

  • 9 ते 13 फेब्रुवारी - पहिली कसोटी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नागपूर

  • 17 ते 21 फेब्रुवारी - दुसरी कसोटी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली

Team India
Ind Vs NZ 2nd T20: हार्दिक पांड्याचे एक वक्तव्य अन् पीच क्युरेटरने गमावली नोकरी; पाहा नेमकं काय झाल?

भारतीय महिला क्रिकेट संघाचे वेळापत्रक

  • 2 फेब्रुवारी – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

  • 6 फेब्रुवारी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सराव सामना

  • 8 फेब्रुवारी – भारत विरुद्ध बांगलादेश, सराव सामना

  • 12 फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान, T20 विश्वचषक

  • 15 फेब्रुवारी - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, T20 विश्वचषक

  • 18 फेब्रुवारी - भारत विरुद्ध इंग्लंड, T20 विश्वचषक

  • 20 फेब्रुवारी - भारत विरुद्ध आयर्लंड, T20 विश्वचषक

टीम इंडिया पात्र ठरल्यास

  • 23 फेब्रुवारी - उपांत्य फेरी 1, T20 विश्वचषक

  • 24 फेब्रुवारी - उपांत्य फेरी 2, T20 विश्वचषक

  • 26 फेब्रुवारी - अंतिम सामना, T20 विश्वचषक

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com