Team India Schedule: आयपीएल संपल्यानंतर क्रिकेट रसिकांसाठी काय? टीम इंडियाचं कसं असेल शेड्यूल, पाहा

Team India Schedule: आयपीएल लीग टप्प्यात फक्त चार ते पाच सामने शिल्लक आहेत, त्यानंतर क्वालिफायर आणि एलिमिनेटर खेळले जातील.
Team India
Team Indiasaam tv

Team India Schedule: आयपीएल अत्यंत रोमांचक अशा अंतिम टप्प्यात आहे. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी संघाची धडपड सुरु आहे. आयपीएल लीग टप्प्यात फक्त चार ते पाच सामने शिल्लक आहेत, त्यानंतर क्वालिफायर आणि एलिमिनेटर खेळले जातील. 28 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे.

आयपीएलच्या सामन्यामुळे क्रिकेट रसिकांना रोज एक विस्मरणीय क्षण अनुभवता येत आहे. मात्र आयपीएल संपल्यानंतर क्रिकेटरसिकांचं काय? त्यांच्यासाठी आयपीएलनंतर टीम इंडियाचं शेड्युल कसं असेल याची माहिती घेऊयात.

Team India
Video : एखाद्या कवितेसारखे आहेत विराट कोहलीचे हे 2 षटकार! 'हे' नाही पाहिले तर मग काय पाहिलं?

बीसीसीआयच्या वेळापत्रकानुसार टीम इंडिया जुलैमध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे, मात्र त्याला अजून उशीर आहे. दरम्यान टीम इंडिया जूनमध्येच दुसरी मालिका खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे वेळापत्रक अद्याप आलेले नसले तरी संभाव्य तारखा नक्कीच समोर आल्या आहेत. (Latest sports updates)

बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड या मालिकेसाठी तयार आहेत. लवकरच त्याच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. एकदिवसीय विश्वचषक भारतात यावर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे, हे लक्षात घेऊन मालिका निश्चित करण्यात आली आहे. तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार असल्याचे वृत्त आहे.

Team India
Virat Kohli Six: केवळ टायमिंग अन् क्लास! किंग कोहलीने जागेवरून खेचला १०३ मीटरचा षटकार, डू प्लेसिसची Reaction व्हायरल - VIDEO

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 16 जूनपासून म्हणजेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीनंतर चार ते पाच दिवसांनी सुरू होऊ शकते. यात कुठेतरी बदल होण्याची शक्यता असली तरी जूनच्या अखेरीस ही मालिका संपणार हे मात्र निश्चित आहे.

अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. कारण भारतातील जवळपास सर्वच मोठे खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत आणि त्यातील १५ खेळाडू WTC च्या फायनलमध्ये खेळणार आहेत. अशा परिस्थितीत  विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना यात विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com