Good News : क्रिकेटर क्रुणाल पंड्याला पुत्रप्राप्ती! चिमुकल्याचं नाव काय ठेवलं? पाहा

Kavir Krunal Pandya Latest News : क्रुणालने फोटो शेयर केल्यानंतर हार्दिकने त्यावर हार्ट इमोजी कमेंट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
Kavir Krunal Pandya
Kavir Krunal PandyaInstagram/@krunalpandya_official

मुंबई: क्रिकेटर कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि त्याची पत्नी पंखुरी यांना पुत्ररत्न (Baby Boy) प्राप्त झाला आहे. या दोघांनी त्यांच्या पहिल्या बाळासोबतचे इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. त्यांनी आपल्या बाळाचे नाव 'कवीर' ठेवले आहे. क्रुणालचा भाऊ हार्दिकलाही यामुळे खूप आनंद झाला आहे, हार्दिक आता काका बनला आहे. क्रुणालने फोटो शेयर केल्यानंतर हार्दिकने त्यावर हार्ट इमोजी कमेंट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. ही बातमी कळल्यावर केएल राहुलसह इतर अनेक क्रिकेटपटूंनी या जोडप्याचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Cricketer Krunal Pandya Baby Boy News)

हे देखील पाहा -

शुभेच्छांचा वर्षाव

क्रुणाल पांड्याचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये क्रिकेट जगतामधील खलील अहमद आणि मोहसीन खान यांची नावे सुरुवातीला दिसली. मोहसीन खान आणि कृणाल पंड्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स या एकाच संघाकडून खेळतात. मोहसीन खानने आपल्या अभिनंदन संदेशात लिहिले- "मुबारकाबाद भैया." झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे खान यांच्याकडून कृणाल पांड्याला अभिनंदनाचा संदेश खास आला होता. तिने कृणाल पांड्याच्या इस्टा पोस्टवर लिहिले, “अभिनंदन! आणि लहान मुलाला खूप प्रेम."

Kavir Krunal Pandya
कौतुकास्पद! मन असावं सोन्यासारखं; तब्बल १० लाखांचे सोन्याचे दागिने लॉन्ड्री चालकाने केले परत

कृणाल पंड्याने पत्नीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघेही बाळाला हातावर घेऊन आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या या मुलाचे नाव कविर कृणाल पंड्या ठेवले आहे. दरम्यान कृणालच्या या घोषणेनंतर आता क्रिकेट विश्वातून त्याला शुभेच्छा देण्यात येत आहे.

कृणाल पांड्याने 27 डिसेंबर 2017 रोजी मॉडेल पंखुरी शर्मासोबत लग्न केले. त्यानंतर पाच वर्षांनी त्यांना पुत्राची प्राप्ती झाली. पंखुरीला मॅच बघायला अजिबात आवडत नाही हे फार कमी लोकांना माहीत असेल. पण ती क्रुणालच्या सगळ्या मॅचेस नक्की पाहते. 2018 मध्ये त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत 19 T20 आणि 5 ODI सामने खेळले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com