Breaking: क्रिकेटपटू विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा दिला राजीनामा

क्रिकेटपटू विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा दिला राजीनामा
Virat Kohli
Virat KohliSaam Tv

नवी दिल्ली. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) आज शनिवारी कसोटी फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून याची घोषणा केली आहे. यामुळे त्याचे सर्व चाहत्यांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. विराटने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकापूर्वीच खेळाच्या 20-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे (ODI) कर्णधारपद काढून घेण्यात आले.

33 वर्षीय विराट कोहलीने 2014 मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 99 सामने खेळले असून 7962 धावा केल्या आहेत.

यातील 68 सामन्यांमध्ये विराटने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. या कालावधीत एकूण 5864 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, कर्णधार नसताना त्याने 31 कसोटी सामने खेळले आणि 2098 धावा केल्या होता.

विराटने शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी 7 वर्षे कठोर परिश्रम आणि सतत प्रयत्न केले आहेत. काहीही चुकू नये म्हणून मी हे काम मेहनतीने केले आहे. प्रत्येक गोष्टीचा अंत आहे आणि माझ्यासाठी आता कसोटी कर्णधारपद आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com