IPL 2022 Final : आयपीएलमध्ये पडणार पैशांचा पाऊस, 'या' संघांना मिळणार कोट्यावधी रुपये

IPL 2022 Final : चॅम्पियन टीमसह पराभूत झालेल्या टीमलाही कोट्यावधी रुपयांचे बक्षिस दिलं जाणार आहेत.
IPL 2022 Final
IPL 2022 Finalsaam tv

मुंबई : अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वाचा (IPL 2022 Final) शेवट अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज रविवारी होणार आहे. नव्यानं पदार्पण केलेल्या गुजरात टायटन्सची (Gujrat Titans) लढत राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) विरोधात होणार आहे. २००८ मध्ये पहिल्याच आयपीएलवर जेतेपद मिळवणारा राजस्थानचा संघ नव्या नवलाईनं आलेल्या गुजरातवर सरस ठरतो का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, आयपीएल २०२२ ची फायनल झाल्यावर प्राईज मनीसह अनेक पुरस्कारांनी खेळाडूंना आणि संघाला सन्मानित केलं जाणार आहे. चॅम्पियन टीमसह पराभूत झालेल्या टीमलाही कोट्यावधी रुपयांची बक्षिसे (Crore rupees awards) दिली जाणार आहेत. जाणून घेवूयात पुरस्कारांची संपूर्ण लीस्ट

IPL 2022 Final
IPL 2022 : फायनलमध्ये होणार धमाल; रणवीर सिंह, ए.आर. रेहमान स्टेडीयम मध्ये पोहोचले, पाहा व्हिडिओ

आयपीएल २०२२ मध्ये अजिंक्यपद मिळणाऱ्या संघाला तब्बल २० कोटी रुपये दिले जाणार आहेत. तसंच फायनल मध्ये पराभूत होणाऱ्या संघालाही १३ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्याचसोबत काही पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

विजेता संघ : 20 कोटी रुपये

उप-विजेता संघ : 13 कोटी रुपये

तिसऱ्या नंबरचा संघ : 7 कोटी रुपये

चौथ्या नंबरचा संघ : 6.5 कोटी रुपये

ऑरेन्ज कॅप : 15 लाख रुपये (सर्वाधिक धावा)

पर्पल कॅप- 15 लाख रुपये (सर्वाधिक विकेट्स )

इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट : 20 लाख रुपये

मोस्ट वॅल्यूएबल प्लेयर ऑफ द सीजन: 12 लाख रुपये

सर्वाधिक छटकार मारण्याचा विक्रम : 12 लाख रुपये

गेम चेंजर ऑफ द सीजन : 12 लाख रुपये

सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन : 15 लाख रुपये

IPL 2022 Final
IPL Final 2022 : आयपीएल फायनल कोण जिंकणार? 'हे' ५ खेळाडू ठरवणार

आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा

जॉस बटलर- 824

के.एल. राहुल- 616

क्विंटन डि कॉक- 508

आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स

वानिंदु हसरंगा- 26 विकेट

युजवेंद्र चहल- 26 विकेट

कगिसो रबाडा- 23 विकेट

ए.आ.र रेहमान आणि नीती मोहन स्टेडियममध्ये पोहोचल्या

आयपीएलच्या क्लोजिंग सेरेमनीत ऑस्कर अवॉर्ड विजेते संगीतकार ए.आर. रेहमान ( A R Rahman), बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranvir singh) आणि गायिका नीती सिंग मोहन नृत्य सादर करणार आहेत. ए.आर.रेहमान आणि नीती मोहन स्टेडीयम मध्ये पोहोचल्या असून त्यांनी सरावही सुरु केला आहे. नीती मोहनने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओही शेअर केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com