....म्हणून चेन्नई सुपर किंग्जच्या 'त्या' खेळाडूवर कॅप्टन कुल धोनी भडकला

MS dhoni
MS dhonigoogle

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या १५ व्या मोसमात (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) खेळाडू अजिंक्यपद मिळवण्यासाठी नवनवीन रणनीती आखत आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधार पद नुकतंच सोडलं. त्यामुळे चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीकडे (Mahendra singh dhoni) सोपवली गेली. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ सोमवारी पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये सनरायजर्स हैद्राबादविरोधात मैदानात उतरला. प्ले ऑफच्या दिशेनं यशस्वी वाटचाल होण्यासाठी धोनीच्या धुरंधर खेळाडूंनी पुन्हा एकदा मोलाची कामगिरी केली. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेव्होन कॉनवे (Devon convey) या सलामी जोडीने पहिल्या विकेट्ससाठी १८२ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यामुळे चेन्नईच्या संघाला दोनशे धावांचा टप्पा सहज पार करता आला. चेन्नईने ठेवलेल्या २०२ धावांचं आव्हान गाठण्यात हैद्राहबादचा संघ अपयशी ठरला. त्यामुळे चेन्नईचा यंदाच्या हंगामात तिसरा विजय मिळवता आला. परंतु, एरव्ही शांत स्वभावाने खेळणारा कॅप्टन कुल धोनी चेन्नई आणि हैद्राबादमध्ये झालेल्या सामन्यात मात्र एका खेळाडूवर भडकल्याचं पाहायला मिळालं.

MS dhoni
IPL 2022: मलिकने टाकला सर्वात वेगवान चेंडू; तरीही पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या नंबर 1

'या' वेगवान गोलंदाजावर धोनी भडकला

चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी कमालीचा फॉर्ममध्ये आहे. हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात मुकेशने चार फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. सोमवारी पुण्यात झालेल्या हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला जिंकवून देण्यात मुकेशचाही सिंहाचा वाटा आहे. परंतु, हैद्राबादच्या फलंदाजांना रोखण्यासाठी धोनीनं मुकेशला शेवटचं षटक टाकायला सांगितलं होतं. त्यावेळी गोलंदाजी करताना मुकेशवर धोनी भडकला आणि सामन्याचं चित्रच पालटलं.

मुकेशने फेकला वाईड चेंडू...

चेन्नई सुपर किंग्जने हैद्राबादसमोर २०३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या हैद्राबादला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या षटकात ३८ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी धोनीनं शेवटचं षटक मुकेशला टाकायला दिलं. स्ट्राईकवर असणाऱ्या निकोलस पुरनने मुकेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकून दहा धावा कुटल्या. तिसऱ्या चेंडूवर निकोलसला एकही धाव काढता आली नाही. पण, मुकेशने फेकलेला चौथा चेंडू वाईड गेल्यानं मुकेशवर धोनी भडकला. धोनीनं विकेट किपींगच्या जागेवरुनच मुकेशला इशारा केला आणि रणनीतीप्रमाणे गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुकेशने फेकलेल्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर निकोलसने सलग दोन षटकार ठोकले. शेवटच्या चेंडूवर निकोलसला फक्त एक धाव काढता आली. त्यामुळे हैद्राबादला २४ धावाच काढता आल्याने चेन्नईने सामना जिंकला.

धोनीनं दिला होता कानमंत्र, मुकेश म्हणाला...

सामना संपल्यानंतर मुकेशने माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, धोनीनं मला स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करायला सांगितलं होतं. गोलंदाजी करताना वेगळं काही करु नको असं धोनीनं सांगितलं होतं. एका षटकात फलंदाजांनी चार षटाकार ठोकले तरी भेदक गोलंदाजी करत राहायचं, असाही सल्ला धोनीनं दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com