गुजरात विरोधात चेन्नईचा दारुण पराभव, कर्णधार धोनी म्हणाला... 'तो' निर्णय चुकीचा होता

आयपीएलच्या १५ व्या मोसमात विजयपथावर पोहचण्यासाठी सर्वच संघामध्ये रस्सीखेच सुरु आहे.
MS Dhoni
MS Dhonisaam tv

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या मोसमात (IPL 2022) विजयपथावर पोहचण्यासाठी सर्वच संघामध्ये रस्सीखेच सुरु आहे. चारवेळा अजिंक्यपद मिळवलेल्या चेन्नई सुपर किंग्जची (Chennai super king) यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी झालीय. सुरुवातीच्या सामन्यात रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, सीएसकेला गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून देण्यात जडेजा सपशेल अपयशी ठरला. त्यानंतर चेन्नईच्या संघात बदल करुन कर्णधार पदाची सूत्र पुन्हा एकदा (Mahendra singh dhoni) महेंद्रसिंग धोनीकडे सोपवली. पण धोनीही प्ले ऑफच्या शर्यतीत चेन्नईला गुणतालिकेत वरच्या स्थानी पोहोचवू शकला नाही. दरम्यान, आज रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडीयम मध्ये गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरोधात झालेल्या सामन्यातही चेन्नईचा दारुण पराभव झाला. चेन्नईच्या संघाची झालेल्या बिकट अवस्थेवर कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं प्रतिक्रिया दिली आहे. धोनीनं सामन्यादरम्यान घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

MS Dhoni
माझा विक्रम मोडण्याच्या नादात हाडं मोडू नको; शोएब अख्तरचा 'या' गोलंदाजाला सल्ला

चेन्नईच्या पराभवानंतर धोनी म्हणाला....

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज मध्ये आज रविवारी मुंबईत झालेल्या सामन्यात चेन्नईचा दारुण पराभव झाला. चेन्नईवर गुजरातने सात विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, चेन्नईचा पराभव एका चुकीमुळं झाला असल्याचं धोनीनं मान्य केलं आहे. धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा चेन्नईचा निर्णय चुकीचा होता, असं धोनीनं माध्यमांशी बोलताना सांगितलं. प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर उसळता चेंडू येत नसल्याने फलंदाजांना धावसंख्या करण्यात अडचणी निर्माण झाल्या.

दुसऱ्या इनिंगमध्ये चेंडू बॅटवर सहजपणे येत होता. साईने चांगली गोलंदाजी केली. शिवम दुबेला आम्ही फलंदाजीसाठी वरच्या स्थानी पाठवू शकलो असतो. परंतु, जगदीशनला जास्तीत जास्त वेळ क्रिजवर घालवता यावा यासाठी आमचा प्रयत्न होता.तसंच धोनीनं श्रीलंकेचा गोलंदाज मथीशा पथिरानाचं कौतुक केलं. मथीशा चांगला गोलंदाज असून थोडाफार लसिथ मलिंगासारखा आहे. मथीशा एक चांगला गोलंदाज असून त्याच्याकडे स्लो बॉल टाकण्याचं कौशल्यही आहे. असंही धोनी म्हणाला.

गुजरात विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने फक्त १३३ धावांच आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर १३४ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करत सात विकेट्स राखून सामना खिशात घातला. चेन्नईने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. यामध्ये चेन्नईने फक्त चार सामने जिंकले असून ९ सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com