चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' खेळाडूच्या निवृत्तीबाबत 'CSK' चं स्पष्टीकरण

सीएसकेचा फलंदाज अंबाती रायडूने आयपीएलच्या निवृत्तीबाबतचं ट्विट डिलीट केलं आहे.
चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' खेळाडूच्या निवृत्तीबाबत 'CSK' चं स्पष्टीकरण
Chennai Super kingSaam TV

मुंबई : आयपीएलमध्ये दणकेबाज फलंदाजी करुन धावांचा पाऊस पाडणारा सीएसकेचा फलंदाज अंबाती रायडूने (Ambati Rayudu) इंडियन प्रिमियर लीगमधून निवृत्त होत असल्यांचं ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं होतं. आयपीएलमध्ये चारवेळा विजयपथावर शिक्कामोर्तब करणारा चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ यंदाच्या मोसमात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अंबाती रायडूने आयपीएल २०२२ चा हंगाम शेवटचा असल्याचं ट्विट केलं होतं. रायडूच्या आयपीलमधून (IPL 2022) बाहेर पडण्याच्या ट्विटमुळे सीएसकेच्या चाहत्यांसह क्रिकेटप्रेमींना धक्का बसला होता. परंतु, आता सीएसकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. रायडूने निवृत्तीबाबतचं ट्विट डिलीट केलं असून चेन्नईच्या संघाचे सीईओ काशी विश्वनाथ (Kasi Viswanathan) यांनी माध्यमांशी बोलताना रायडूच्या निवृत्तीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. अंबाती रायडू आयपीएलमधून निवृत्ती घेत नसल्यांचं विश्वनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांच्या रायडूला पुन्हा एकदा मैदानात खेळताना पाहण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Chennai Super king
IPL: चेन्नईचे भविष्य उज्वल, सेहवागने सांगितला MS Dhoni चा उत्तराधिकारी

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे दोनच सामने राहिले आहेत.चेन्नईचा संघ प्लेऑफमधून आधीच बाहेर पडला आहे. दरम्यान, ३६ वर्षांच्या रायडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत १८७ सामने खेळले असून २९.०८ च्या सरासरीनं त्याने ३२९० धावा कुटल्या आहेत.तसचं आयपीएल करियरमध्ये रायडूने एक शतकंही ठोकलं असून २२ अर्धशतकांची दमदार खेळीही त्याने केली आहे. रायडूने आयपीएलमधून निवृत्त होत असल्याची घोषणा ट्विटरवरू केली होती.

'आयपीएल २०२२ चा हंगाम माझ्यासाठी शेवटचा असेल. मी तेरा वर्ष आयपीएलमध्ये दोन मोठ्या संघांसाठी खेळलो आहे. मुंबई इंडियन्स आणि सीएसकेसाठीचा आयपीएलमधील प्रवास उत्तम होता. त्यामुळे सर्वांचे आभार.' असं रायडूने ट्विटमध्ये म्हटलं होत. परंतु, काही वेळानंतर रायडूने हे ट्विट डिलीट केलं. त्यानंतर चेन्नईच्या संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी माध्यमांशी बोलताना रायडूच्या निवृत्तीबाबत स्पष्टीकरण दिलं. बाती रायडू आयपीएलमधून निवृत्ती घेत नसल्यांचं विश्वनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

रायुडूने 2013 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून वनडे पदार्पण केले होते. त्याने 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1694 धावा केल्या. यामध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 2019 मध्ये, जेव्हा अंबाती रायडूला विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही, तेव्हा त्याच्या जागी आणखी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला, त्यानंतर त्याने अचानक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तेव्हा तो चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा प्रबळ दावेदार होता. संघाची निवड न झाल्याचा फटका संघाला सहन करावा लागला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभवाचे हेही एक कारण होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.