IPL 2022 : धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ 'प्ले ऑफ'मध्ये पोहचणार; दिग्गज खेळाडूला विश्वास

IPL 2022 : धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ 'प्ले ऑफ'मध्ये पोहचणार; दिग्गज खेळाडूला विश्वास
MS Dhonigoogle

मुंबई : सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध झालेल्या लढतीत महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra singh dhoni) नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) १३ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे धोनीचा कर्णधार म्हणून असलेला दांडगा अनुभव पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender sehwag) धोनीच्या कौशल्यांवर टीप्पणी केली आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ 'प्ले ऑफ'मध्ये पोहचू शकतो, असा विश्वास सेहवागने व्यक्त केला आहे. धोनी कर्णधार असताना भारताला ऐतिहासीक विजय मिळवून दिल्याचा हवालाही सेहवागने दिला आहे. दरम्यान, सीएसके गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून आरसीबीसोबत ४ मे ला चेन्नईची पुढची लढत होणार आहे.

MS Dhoni
IPL 2022: एक विजय अन् गुजरात प्लेऑपमध्ये; पंजाबला हार न परवडणारी

आयपीएलचं १५ वं पर्व सुरु झाल्यापासून सर्व संघांची प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. दिग्गज खेळाडूंसह नवखे खेळाडूही आयपीएलमध्ये आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जने चारवेळा अजिंक्यपद पटकावलं आहे. मात्र यंदाच्या मोसमात सुरुवातीच्या काही साामन्यांमध्ये रविंद्र जडेजाकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. पण जडेजाला चेन्नईच्या संघाला गुणतालिकेत वरच्या स्थानी नेता आलं नाही. त्यानंतर पुन्हा एकदा अनुभवी खेळाडू महेंद्र सिंग धोनीला चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

काय म्हणाला विरेंद्र सेहवाग ?

सेहवागने माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, महेंद्रसिंग धोनीसोबत मी २००५ पासून आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघात झालेले बदल मी पाहिले आहेत. धोनी कर्णधार असताना भारताने आयसीसीचे काही चषक जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारतातही अनेक सामने जिंकले आहेत. काही सामने पराभवाच्या दिशेनं जात असतानाही धोनीने सामने जिंकवून दिले आहेत. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वात सीएसके प्ले ऑफमध्ये पोहचू शकतो, असं मला वाटतं.

'CSK' आणि 'RCB' आमने-सामने

चेन्नई सुपर किंग्जने आतापार्यंत झालेल्या ९ सामन्यांमध्ये ३ सामने जिंकले आहेत. प्ले ऑफमध्ये शेवटच्या चौथ्या स्थानी जाण्यासाठी चेन्नईला यापुढे होणाऱ्या सर्व सामन्यांमध्ये जिंकावं लागणार आहे. चेन्नईचा पुढचा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमध्ये ४ मे ला होणार आहे. आरसीबीचा संघही विजयासाठी संघर्ष करत आहे. गेल्या काही सामन्यांत सनरायजर्स हैद्राबाद, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स विरोधात आरसीबीचा पराभव झाला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.