
GT VS CSK, IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज क्वालिफायरचा पहिला सामना रंगणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत रंगणार आहे.
या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला थेट फायनलचं तिकीट मिळणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. मात्र दोन्ही संघ हाच सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
गुजरात टायटन्स संघात बिग हिटर्स आहेत. जे कुठल्याही क्षणी येऊन तुफान फटकेबाजी करू शकतात. हे पाहता चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून स्वतः कर्णधार एमएस धोनी बिग हीटिंग करण्यासाठी येऊ शकतो.
संपूर्ण हंगामात जर तुम्ही पाहिलं तर एमएस धोनी शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करण्यासाठी आला आहे. मात्र आज तो टॉप ऑर्डरला फलनादजी करण्यासाठी येऊ शकतो. २०११ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही एमएस धोनीने असेच काहीतरी केले होते.
आज पुन्हा एकदा धोनी याच रणनीतीचा वापर करू शकतो. यामुळे नक्कीच विरोधी संघातील गालंदाजांवर दबाव येऊ शकतो.
चेन्नई सुपर किंग्ज संघाबद्दल बोलायचं झालं तर या संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. पॉईंट्स टेबल बद्दल बोलायचं झालं तर, १४ पैकी ८ सामने जिंकून १७ गुणांसह हा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
तर गुजरात टायटन्स संघाबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने संपूर्ण हंगामात जोरदार कामगिरी केली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने १४ पैकी १० सामने जिंकून २० गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे. (Latest sports updates)
अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११:
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, वृद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, यश दयाल, मोहित शर्मा.
चेन्नई सुपर किंग्ज: डेवोन कॉनव्हे ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चाहर, महीष थिक्षणा, मथीषा पथिराना, तुषार देशपांडे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.