धोनीनं घोडचूक केलीय का? CSKने सोडलेला फलंदाज पाडतोय धावांचा पाऊस, कोण आहे हा महारथी?

विजय हजारे ट्रॉफीत जगदिशनने धडाकेबाज फलंदाजी करत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
N jagdishan
N jagdishanSaam Tv

N Jagdishan Record: आगामी आयपीएल सीजनच्या आधी नुकसात मिनी लिलाव पार पडला. यामध्ये संघांनी अनेक खेळाडूंना रिटेन केलं तर काहींना रिलीज केलं. चेन्नई सुपरकिंग्स संघानेही त्यांचा फलंदाज एन जगदिशनला रिलीज केलं. मात्र चेन्नईल कदाचित आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत असेल. कारण विजय हजारे ट्रॉफीत जगदिशनने धडाकेबाज फलंदाजी करत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. (Cricket News)

तामिळनाडूचा सलामीवीर नारायण जगदीशनने विजय हजारे ट्रॉफीतील त्याचं सलग पाचवं शतक साजरं केलं आहे. यासह त्याने विश्वविक्रमही केला आहे. जगदीशन लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग पाच शतके झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. जगदीशनला IPLमध्ये चेन्नईसाठी विशेष काही करता आले नाही. त्यामुळेच मिनी लिलावापूर्वी त्याला रिलीज करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जगदीशनने आता विजय हजारे ट्रॉफी अप्रतिम फलंदाजी केली आहे. (Latest Marathi News)

N jagdishan
Team India: सूर्यकुमारमुळे विराटची 'ती' जागा जाणार? सूर्यकुमारच्या शतकामुळे टीम इंडियात मोठ्या बदलांची शक्यता

जगदीशनने विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या सहा डावात 799 धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यादरम्यान त्याने सलग पाच डावात शतक ठोकून विश्वविक्रम केला आहे. या स्पर्धेत त्याची सरासरी 159.80 आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट 125.82 आहे.

जगदीशनने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 141 चेंडूत 277 धावा केल्या आणि त्याच्या या शानदार खेळीमुळे तामिळनाडूने या सामन्यात दोन गडी गमावून 506 धावा केल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 500 हून अधिक धावा करणारा तामिळनाडू हा पहिला संघ आहे. या सामन्यात जगदीशनशिवाय साई सुदर्शननेही 154 धावांची खेळी केली.

जगदीशनने संगकाराला टाकलं मागे

विजय हजारे ट्रॉफीमधील पाचव्या शतकासह जगदीशन लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग शतके करणारा खेळाडू बनला आहे. त्याने श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराचा विक्रम मोडला आहे. संगकाराने 2014-15 वर्ल्ड कपमध्ये सलग चार शतके झळकावली होती. त्याच्याशिवाय, भारताच्या देवदत्त पडिक्कलने 2020-21 विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग चार शतके झळकावली होती. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेच्या एल्विरो पीटरसनने 2015-16 मोमेंटम एकदिवसीय चषक स्पर्धेत सलग चार डावात शतके झळकावली. मात्र, सलग पाच डावांत शतक झळकावणारा जगदीशन हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

N jagdishan
Ind vs NZ 3rd T20 : रिषभ पंतचा पत्ता कट? ओपनिंग स्पेशालिस्ट 'धाकड' फलंदाजाला मिळणार संधी

यंदाच्या विजय हजार ट्रॉफीमध्ये कामगिरी

 • पहिला सामना: बिहारविरुद्ध सहा चेंडूत पाच धावा

 • दुसरा सामना: आंध्र प्रदेशविरुद्ध 112 चेंडूत नाबाद 114 धावा केल्या.

 • तिसरा सामना: छत्तीसगड विरुद्ध 113 चेंडूत 107 धावा केल्या.

 • चौथा सामना: गोव्याविरुद्ध 140 चेंडूत 168 धावा केल्या.

 • पाचवा सामना: हरियाणाविरुद्ध 123 चेंडूत 128 धावा केल्या.

 • सहावा सामना: अरुणाचल प्रदेश विरुद्ध 141 चेंडूत 277 धावा केल्या.

विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक शतके

 • एन जगदीशन - 5* (2022)

 • विराट कोहली - 4 (2008–09)

 • पृथ्वी शॉ - 4 (2020-21)

 • ऋतुराज गायकवाड - 4 (2021-22)

 • देवदत्त पडिक्कल - 4 (2020-21)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com