CSK vs GT Final Weather Update: बॅड न्यूज! आजचा सामना होणार रद्द? समोर आली मोठी अपडेट

Ahmedabad Weather: क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर येत आहे
csk vs gt
csk vs gtsaam tv

CSK vs GT,IPL Final Live Updates: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात फलंदाजांपुर्वी पावसाने जोरदार बॅंटिग केली आहे. मात्र आता मोठी अपडेट समोर आली आहे.

csk vs gt
CSK vs GT Live Score, IPL 2023 Final: IPL च्या अंतिम सामन्यात गुजरात आणि चेन्नई आमने-सामने; धोनी की हार्दिकची जादू चालणार?

पावसाने केला 'गेम'

अंतिम सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला आहे. जोरदार पाऊस असल्यामुळे क्लोसिंग सेरेमनीचा कार्यक्रम देखील होऊ शकला नाहीये. मात्र हा सामना रद्द झाल्यास कोणता संघ विजयी होणार? कसा लागेल निकाल? जाणून घ्या.

आज सामना नाही झाला तर काय होणार?

आयपीएल स्पर्धेत साखळी फेरीतील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना १-१ गुण दिला जातो. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की, अंतिम सामन्यात असं काही झालं तर काय होणार? आनंदाची बातमी अशी की, आजचा सामना न झाल्यास उद्याचा दिवस रिझर्व डे म्हणून ठेवण्यात आला आहे. अशातच आज जर ५-५ षटकांचा सामना नाही झाला तर, सोमवारी हा सामना खेळवला जाईल. मात्र पाऊस थांबला असुन लवकरच सामन्याला सुरूवात होणार आहे. हा सामना ९ वाजुन ३५ मिनिटांनंतर सुरू झाल्यास षटके कमी केले जाऊ शकतात.

csk vs gt
IPL 2023 Prize Money: विजेत्या, उपविजेत्या संघासह खेळाडूंवरही होणार पैशांचा वर्षाव, जाणून घ्या बक्षीसांची रक्कम

पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण होणार विजेता?

१) सामना सुरू झाला आणि पाहिली इनिंग झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये पाऊस पडला तर डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लावला जाईल.

२) जर एकही चेंडू फेकला गेला नाहीये आणि सामना अजूनही सुरू व्हायचा आहे. असे झाल्यास १२.५० वाजेपर्यंत सुपर ओव्हरचा सामना खेळवला जाईल. असे झाल्यास सुपर ओव्हरच्या साहाय्याने विजेत्या संघाची निवड केली जाईल. (CSK VS GT Weather Report)

३) पाऊस थांबला आणि वेळ शिल्लक असेल तर कमीत कमी ५ ओव्हर्साचा सामना खेळवला जाईल.

४) जर हा सामना आज नाही झाला तर उद्याचा दिवस हा रिझर्व डे असणार आहे. (Latest sports updates)

csk vs gt
IPL Final 2023 CSK vs GT: धोनीला हरवणं सोप्प नव्हं! CSK च्या 'या' पाच गोष्टी ठरणार 'हार्दिक'साठी घातक?

काय सांगतो नियम?

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटे दिली गेली आहेत. ५-५ षटकांचा सामना खेळवण्यासाठी १२.०६ वाजेपर्यंत वाट पाहिली जाईल. मात्र एकही चेंडू न पडल्यास हा सामना उद्या खेळवण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com