CSK vs GT IPL 2023 Final: आयपीएल फायनलबाबत मोठी अपडेट; आजही पाऊस आला, तर या संघाचा विजय पक्का!

CSK vs GT IPL 2023 Final Updates: आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज (सोमवारी) खेळवला जाणार आहे.
CSK vs GT IPL 2023 Final Updates
CSK vs GT IPL 2023 Final UpdatesSaam TV

CSK vs GT IPL 2023 Final Updates: आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज (सोमवारी) खेळवला जाणार आहे. मुळात हा सामना रविवारी (28 मे) होणार होता. मात्र, पावसाने खोडा घातल्याने तो राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest sports updates)

दरम्यान, आजही जर अहमदाबादच्या मैदानावर पाऊस झाला आणि सामना होऊ शकला नाही, तर ही चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी असेल. कारण, पावसामुळे सामना झाला नाही, तर साखळी फेरीअखेर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला विजयी घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असल्याने ते विजयी होतील.

CSK vs GT IPL 2023 Final Updates
CSK vs GTC Final, Viral Video: एकच फाईट अन् वातावरण टाईट!भर पावसात महिलेनं पोलिसाला मारली कानाखाली; कारण काय? - VIDEO

आयपीएलच्या फायनल सामना हा रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता. मात्र, सामन्याआधीच पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आजचा सामना न करण्याचा निर्णय घेतला.(Indian Premier League 2023)

आयपीएल इतिहासात प्रथमच आयपीएल अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. सायंकाळी सात वाजता नाणेफेक होऊन ७.३० वाजता सामना सुरू होणे गरजेचे होते. मात्र, सायंकाळी सहा वाजल्यापासून अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे सर्व खेळाडू व कर्मचारी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते.

राखीव दिवशीही पाऊस पडणार का?

दरम्यान, रविवारी 60 टक्के पाऊस पडणार, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. हवामान खात्याचा (Cricket News) हा अंदाज आता खरा ठरला आहे. त्यामुळे आता सोमवारी त्यांनी दिलेला अंदाज खरा ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. सोमवारबाबत हवामान खात्याने सांगितले आहे की, आकाशात काळे ढग असतील. त्यामुळे आकाश निरभ्र नक्कीच नसेल.

त्याचबरोबर सोमवारी तीन टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच रविवार एवढा पाऊस नक्कीच सोमवारी पडणार नाही. पण पाऊस हा सोमवारच्या दिवसाचा खेळ बिघडवू शकतो. कारण पाऊस जर सामना सुरु असताना  (Sport News) पडला तर त्यामुळे खेळ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे पुन्हा खेळखंडोबा होऊ शकतो. त्यामुळे जरी सोमवारी जास्त पाऊस पडणार नसला तरी आकाश ढगाळ असेल आणि पावसाची चिन्हे असतील. त्यामुळे सोमवारी सामना होण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com