अष्टपैलू हार्दिक पांड्याला कस्टम विभागाचा दणका, मुंबई विमानतळावर कारवाई

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आता अडचणीत येत असताना दिसत आहे.
अष्टपैलू हार्दिक पांड्याला कस्टम विभागाचा दणका, मुंबई विमानतळावर कारवाई
अष्टपैलू हार्दिक पांड्याला कस्टम विभागाचा दणका, मुंबई विमानतळावर कारवाईSaam Tv

वृत्तसंस्था : टीम इंडियाचा India ऑलराऊंडर हार्दिक पांड्या Hardik Pandya आता अडचणीत येत असताना दिसत आहे. खराब फॉर्ममुळे हार्दिक पांड्या याला टीम इंडियामधून वगळण्यात आले आहे. यानंतर आता मुंबई विमानतळावर त्याच्याकडून ५ कोटींची दोन घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. कस्टम विभागाकडून ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

हार्दीक पांड्या टी-२० वर्ल्ड कपकरिता टीम इंडियाबरोबर यूएईमध्ये होता. तेथून परत येत असताना मुंबई विमानतळावर कस्ट विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूएईमधून मुंबईत आलेल्या हार्दिक पांड्या याला कस्टम विभागाने थांबवले आणि त्याच्याकडून २ महागडी घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. या २ घड्याळांची किंमत ५ कोटी रुपये इतकी आहे.

हार्दिक पांड्या याने कस्टम विभागाला या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्या घड्याळांची बिल ही हार्दिक पांड्या जवळ नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. भारतीय ऑलराऊंडर पांड्या घड्याळांचा खूप शौकीन आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. त्याच्याकडे फिलिप नॉटिलस प्लॅटिनम ५७११ घड्याळासह दुर्मिळ आणि महागड्या ब्रँडमधील अनेक घड्याळ आहेत.

अष्टपैलू हार्दिक पांड्याला कस्टम विभागाचा दणका, मुंबई विमानतळावर कारवाई
संतापजनक ! दोन मैत्रिणींना वही देण्याच्या बहाण्याने बोलावले घरी; अन्...

मागीलवर्षी हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पांड्या देखील अशाच एका प्रकरणामध्ये अडकलेला होता. त्याने सीमाशुल्क विभागाला महागड्या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्यानंतर त्याच्याकडे असलेले घड्याळे जप्त करण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com