Common Wealth Games : भारतास झटका; उत्तेजक द्रव्य चाचणीत धनलक्ष्मी, ऐश्वर्या बाबू दाेषी

पुढील आठवड्यात राष्ट्रकुल स्पर्धेस प्रारंभ हाेणार आहे.
S Dhanalakshmi , aishwarya babu , Common Wealth Games
S Dhanalakshmi , aishwarya babu , Common Wealth Gamessaam tv

नवी दिल्ली : अव्वल धावपटू एस धनलक्ष्मी (S Dhanalakshmi) आणि तिहेरी उडीत तरबेज असलेली ऐश्वर्या बाबू (aishwarya babu) या दाेन्ही भारतीय (india) खेळाडूंना (players) राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचे दरवाजे बंद हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तेजक द्रव्य चाचणीचा (Dope Test) दाेन्ही खेळाडूंच्या आलेल्या अहवालावरुन सूत्रांनी आज (बुधवार) संबंधित माहिती दिली आहे. (common wealth games 2022)

बर्मिंगहॅम येथे हाेणा-या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी (36 सदस्यीय) भारतीय ऍथलेटिक्स संघात धनलक्ष्मी हिचा समावेश आहे. जागतिक ऍथलेटिक्सच्या ऍथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट (AIU) द्वारे परदेशात घेण्यात आलेल्या डोप चाचणीमध्ये बंदी घातलेल्या स्टिरॉइडसाठीचा धनलक्ष्मी हिचा अहवाल सकारात्मक आला आहे.

एआययूने केलेल्या डोप चाचणीत धनलक्ष्मीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ती बर्मिंगहॅमच्या स्पर्धेसाठी जाऊ शकणार नाही असे एका उच्चपदस्थ अधिका-याने त्यांचे नाव प्रसिद्धी न करण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.

व्हिसाचा ठरला अडसर

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी एस धनलक्ष्मी (100 मीटर) आणि (4x100) मीटर रिलेसाठी दुती चंद, हिमा दास आणि श्राबानी नंदा या खेळाडूंसह देशाचे प्रतिनिधित्व करणार हाेती. युजीन, यूएसए येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी देखील तिचा भारतीय संघात समावेश करण्यात आला हाेती. परंतु व्हिसाच्या समस्यांमुळे ती या स्पर्धेत सहभागी हाेऊ शकली नाही. धनलक्ष्मीने (26 जून) रोजी कोसानोव्ह मेमोरियल मैदाना स्पर्धेत (sports) (200 मीटरमध्ये) सुवर्णपदक पटकावित (22.89) सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.

ऐश्वर्या बाबूचा अहवाल पाॅझिटीव्ह

गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान (NADA) अधिकाऱ्यांनी घेतलेल्या २४ वर्षीय ऐश्वर्या बाबूचा डोप नमुन्याचाही अहवाल सकारात्मक आला आहे. "तिहेरी उडीत ऐश्वर्या बाबूचा राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिप दरम्यान घेतलेला नमुना सकारात्मक आला आहे," सूत्राने सांगितले. ऐश्वर्याने तिहेरी उडीचा राष्ट्रीय विक्रम (14.14 मीटर्सच्या) अप्रतिम प्रयत्नात मोडून काढला होता.

Edited By : Siddharth Latkar

S Dhanalakshmi , aishwarya babu , Common Wealth Games
Ozarde Waterfall : सावधान ! ओझर्डे धबधबा पाहायला निघालांत ? नवजा रस्त्यास पडलयं भगडाद
S Dhanalakshmi , aishwarya babu , Common Wealth Games
'कोई नही है टक्कर में, क्यू पडेहो चक्कर में'; अविनाश साबळेसह माेदींच्या राष्ट्रकुलसाठी खेळाडूंना शुभेच्छा
S Dhanalakshmi , aishwarya babu , Common Wealth Games
...तरच जवानास अपंगत्व निवृत्ती वेतन : सर्वोच्च न्यायालय

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com