
कराची : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने आपल्याच देशाच्या क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांच्या धमकीला पोकळ म्हटले आहे. पीसीबी प्रमुखांनी २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल होती. (Sports News)
रमीझ राजा यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाही, तर पाकिस्तान भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावरही बहिष्कार टाकेल. यावर दानिश कनेरियाने म्हटले आहे की, पीसीबीकडे वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची कुवत नाही. (Latest Marathi News)
दानिश कनेरिया पुढे म्हणाला, 'पीसीबीकडे आयसीसीच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याची हिंमत नाही. दुसऱ्या बाजूला भारत आहे, ज्याला पाकिस्तान विश्वचषकासाठी आला किंवा नाही आला तरी काहीही फरक पडणार नाही. त्यांच्याकडे महसुलासाठी मोठी बाजारपेठ आहे. वर्ल्डकपसाठी भारतात न जाण्याने पाकिस्तानचेच नुकसान होईल.
'पाकिस्तानला भारतात विश्वचषक खेळण्यासाठी जावं लागेल. अधिकारी नंतर म्हणतील की आयसीसीचा दबाव आहे आणि आम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळेच तुम्ही आयसीसीच्या स्पर्धेमधून माघार घेण्याबाबत वारंवार बोलत असाल तर त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचे नुकसान होईल, असंही कनेरिया याने म्हटलं.
जय शहा यांच्या वक्तव्यानंतर सुरुवात
आशिया कप 2023 पाकिस्तानात होणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गेल्या महिन्यात भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले होते. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा म्हणाले होते की, असे झाल्यास पाकिस्तान २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.