David Warner On Loss: दिल्लीच्या पराभवाला पृथ्वी कारणीभूत? संतापलेल्या वॉर्नरने सांगितली पराभवाची कारणं

David Warner Statement RCB vs DC IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे
David Warner
David WarnerSaam TV

RCB vs DC IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाला सलग ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघातील मुख्य फलंदाज पावरप्लेच्या षटकांमध्येच माघारी परतले.

तिसरे षटक सुरू असतानाच दिल्लीचे ३ फलंदाज माघारी परतले होते. या दारुण पराभवानंतर डेव्हीड वॉर्नरने पराभवाची कारणं सांगितली आहेत.

David Warner
IPL 2023 Shikhar Dhawan: शिखर धवन ऐवजी सॅम करन टॉससाठी का आला? यामागचं प्रमुख कारण आलं समोर

पृथ्वी शॉच्या रनआऊट बद्दल बोलताना वॉर्नर म्हणाला..

'मी नाणेफेकीच्या वेळी म्हटले होते की, आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्रात चांगली कामगिरी करायची आहे. मात्र या सामन्यात असे काहीच झाले नाही. आम्ही सुरुवातीलाच विकेट्स गमावल्या. या धावांचा सहजरित्या पाठलाग करता आला असता. मात्र आम्हाला विजय मिळवता आला नाही. या फॉरमॅटमध्ये रनआऊट सोबत कुठलीही तडजोड करता येणार नाही. रनआऊटमुळे सामना गमवावा लागू शकतो.' (Latest sports updates)

David Warner
RCB VS DC IPL 2023: कुलदीप - मार्शची अप्रतिम गोलंदाजी, आता दिल्लीला पहिला विजय मिळवण्यासाठी १७५ धावांची गरज

सिराजच्या गोलंदाजीबद्दल बोलताना वॉर्नर म्हणाला..

'सिराजने अप्रतिम गोलंदाजी केली. ज्याप्रकारे तो आला आणि त्याने सुरुवात करून दिली, ती उल्लेखनीय होती. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील सुरेख होते. आम्ही देखील चांगली गोलंदाजी केली. आम्हाला फलंदाजीमध्ये योगदान द्यायची आणि टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी भागीदारी करण्याची गरज आहे. आमच्या संघाने यापूर्वी देखील ५ सामने गमावून जोरदार पुनरागमन केलं आहे.'

David Warner
Suryakumar Yadav In IPL 2023: मुंबईचा 'सूर्या'स्त, सलग ६ सामन्यात चौथ्यांदा गोल्डन डक वर बाद; संघाबाहेर होण्याची भिती

पृथ्वी शॉचा फॉर्म..

दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ या हंगामात निराशाजनक कामगिरी करतोय. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध खेळताना ०, मुंबई विरुद्ध खेळताना १५, राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना ०, गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना ७ आणि लखनऊ विरुद्ध खेळताना १२ धावांवर माघारी परतला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com