
IND vs AUS:भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत २-० ची आघाडी घेतली आहे.
तर तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून इंदोरच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने निवृत्तीचे संकेत दिले आहे.(Latest Sports Updates)
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने केले मोठे वक्तव्य...
ऑस्ट्रेलिया संघाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला सध्या हवी तशी कामगिरी करता येत नाहीये. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. तर कोपर फ्रॅक्चर झाल्यामुळे तो दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर मायदेशी परतला आहे.
आता त्याने म्हटले आहे की, जर निवडकर्त्यांनी कसोटी कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला तर तो २०२३ पर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल.
दिल्ली कसोटीत फलंदाजीला येऊ शकला नव्हता..
डेव्हिड वॉर्नरच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळे तो फलंदाजी सोडून मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर तो फलंदाजीला येऊ शकला नव्हता. त्याने सिडनी एअरपोर्टवर पत्रकारांना म्हटले की, "मी नेहमीच म्हणत आलो आहे की,मला २०२४ पर्यंत खेळायचं आहे. जर निवडकर्त्यांना वाटत असेल की, मी कसोटी संघात खेळण्यासाठी फिट बसत नाही. तर याबाबत काहीच करता येणार नाही. मी मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळू शकतो."
ही मालिका झाल्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मानाची मालिका ऍशेस मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी तो ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
तसेच तो पुढे म्हणाला की, "माझ्याकडे १२ महिने शिल्लक आहेत. आम्हाला भरपूर क्रिकेट खेळायचं आहे. जर मी संघासाठी धावा करत राहिलो तर नक्कीच संघात स्थान मिळवू शकतो."
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.