IPL 2023 Playoffs Race: चेन्नईचा प्लेऑफमध्ये थाटात प्रवेश; मुंबई इंडियन्सची धाकधूक वाढली; समीकरण पार बदललं!

IPL 2023 Playoffs Race: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ६७ वा सामना आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघात झाला.
IPL 2023 Playoffs Race
IPL 2023 Playoffs RaceIPL/twitter

IPL 2023 DC vs CSK: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ६७ वा सामना आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा ७७ धावांनी दारूण पराभव केला आहे. (Latest Marathi News)

या विजयासह चेन्नईचे १७ गुण झाले असून त्यांनी प्लेऑफमध्ये थाटात प्रवेश केला आहे. नेट रनरेटही चांगला असल्याने चेन्नईचा संघ आता दुसऱ्या क्रमांकावर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, चेन्नईच्या विजयाने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला असून त्यांना आता लखनौ आणि आरसीबीच्या पराभवाची वाट पाहावी लागणार आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीपुढे विजयासाठी तब्बल २२४ धावांची लक्ष ठेवले होते.

चेन्नईने दिलेल्या २२४ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरेल्या दिल्लीच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली. यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉ फ्लॉप ठरला. या सामन्यात पृथ्वी स्वस्तात माघारी परतला. तर पाचव्या षटकात दिल्लीला दोन झटके बसले. दीपक चहरने साल्ट , राइलीला त्रिफळाचित केले.

आठ षटकानंतर दिल्लीच्या तीन गडी गमावून ४७ धावा झाल्या होत्या. यशच्या रुपात दिल्लीला चौथा धक्का बसला. यशने १५ चेंडूत १३ धावा कुटल्या. त्यानंतर दीपक चहरने अक्षर पटेलला बाद केले. अक्षरने ८ चेंडूत १५ धावा कुटल्या . दिल्लीच्या १६ व्या षटकात १३० धावा झाल्या होत्या. तर दिल्लीला सहा धक्का अमन खानच्या रुपाने बसला.

IPL 2023 Playoffs Race
IPL 2023 Playoffs Race: मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकच मार्ग शिल्लक! रोहित सेनेला करावं लागेल हे काम

दिल्लीचा कर्णधार ८६ धावा करून माघारी परतला. डेविडने ७ चौकार आणि ५ षटकार लगावले. डेविडला मथीशाने झेलबाद केले. ऋतुराज गायकवाडने डेविडचा झेल पकडला. चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीचा संपूर्ण संघ गारद झाला. चेन्नईने दिल्लीवर ७७ धावांनी मात केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com