DC vs KKR: दिल्ली बदला घेणार? 9 वर्षापुर्वी प्लेऑफमध्ये आले होते आमने-सामने

9 वर्षापुर्वी कोलकाताने दिल्लीच्या संघाला प्लेऑफ मध्ये पराभूत केले होते.
DC vs KKR: दिल्ली बदला घेणार? 9 वर्षापुर्वी प्लेऑफमध्ये आले होते आमने-सामने
DC vs KKR: दिल्ली बदला घेणार? 9 वर्षापुर्वी प्लेऑफमध्ये आले होते आमने-सामनेTwitter

आयपीएल 2021 (IPL 2021) आता अंतिम टप्प्यात आहे. दोन सामने बाकी आहेत. महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत आणि इऑन मॉर्गन यांच्यापैकी ट्रॉफी कोण घेणार हे 15 ऑक्टोबर रोजी कळणार आहे. त्याआधी, दुसऱ्या पात्रता फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. या सामन्यात दिल्लीचा संघ बदला घेण्याच्या भावनेने उतणार आहे. 9 वर्षापुर्वी कोलकाताने दिल्लीच्या संघाला प्लेऑफ मध्ये पराभूत केले होते. या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात कोलकाताच्या संघाने मजबूत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला आहे. दुसरीकडे, गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला क्वालिफायर 1 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही संघांना विजय मिळवून अंतीम सामना खेळायचा आहे.

DC vs KKR: दिल्ली बदला घेणार? 9 वर्षापुर्वी प्लेऑफमध्ये आले होते आमने-सामने
परमबीर सिंगांची बेनामी मालमत्ता? बनावट शेतकरी दाखल्याचा वापर; पाहा Video

कोलकाता आणि दिल्लीचा (KKR vs DC) संघ 9 वर्षांनंतर प्लेऑफमध्ये (Play-off) आमनेसामने येणार आहे. शेवटच्या वेळी विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) दिल्लीचा कर्णधार होता. त्याचवेळी कोलकाताचा कर्णधार होता गौतम गंभीर (Gautam Gambhir). आता दोघेही खेळाडू निवृत्त झाले आहेत. त्यावेळी कोलकाताने दिल्लीच्या संघाला पराभूत केले होते. दिल्लीच्या संघाने आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत आहे. त्यामुळे दिल्लीच्या संघाचे पारडे जड आहे.

दरम्यान, कोलकाताचा संघ अतीशय संघर्ष करुन प्लेऑफ मध्ये पोहोचला आहे. मागच्या सामन्यात सुनील नारायनने अतीशय चांगली खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. सुनील नारायन ने ४ बळी घेवून चांगली फलंदाजी करुन संघाला विजय मिळवून दिला होता. कोलकाताच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.