DC vs UPW : ताहलिया मॅकग्राची तुफानी खेळी व्यर्थ! मेग लॅनिंगच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीचा यूपीवर शानदार विजय

WPL 2023: ताहलिया मॅकग्राच्या 90 धावांच्या शानदार खेळीनंतरही दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात यूपी वॉरियर्स संघाला 42 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.
DC vs UPW WPL 2023
DC vs UPW WPL 2023Twitter

DC vs UPW WPL 2023: ताहलिया मॅकग्राच्या 90 धावांच्या शानदार खेळीनंतरही दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात यूपी वॉरियर्स संघाला 42 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. दिल्लीने दिलेल्या 212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीचा संघ 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 169 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

ताहलिया मॅकग्राने 50 चेंडूंत 11 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 90 धावांची तुफानी खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून जेस जोनासेनने चार षटकांत ४३ धावांत तीन बळी घेतले.

DC vs UPW WPL 2023
Mumbai News : वर्षभर पोट दुखत होतं, मग डॉक्टरांकडे गेली; महिलेचा सोनोग्राफी रिपोर्ट पाहून डॉक्टर आश्चर्यचकीत!

तत्पूर्वी कर्णधार मेग लेनिंगच्या अर्धशतकी खेळीनंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि जेस जोनासेन यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात डेथ ओव्हरमध्ये चार गडी गमावून 211 धावा केल्या. (Latest Sports News)

DC vs UPW WPL 2023
MI VS RCB: गोलंदाजीत हिट फलंदाजीत सुपरहिट! पोलार्ड - रसलचं मार्केट डाऊन करणारी हेली आहे तरी कोण?

लॅनिंगने 42 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली. जेमिमाने 22 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 34 धावांची खेळी केली, तर जेस जोनासेनने 20 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com