IPL 2022 : पंत-राहुल पुन्हा आमने-सामने; दिल्ली समोर लखनऊचं आव्हान, 'अशी' असेल प्लेईंग ११

IPL 2022 : पंत-राहुल पुन्हा आमने-सामने; दिल्ली समोर लखनऊचं आव्हान, 'अशी' असेल प्लेईंग ११
kl rahul And Rishabh pantgoogle

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या (IPL 2022) मोसमात एकाहून एक रंगतदार सामने होत आहेत. गेल्या आठ सामन्यांमध्ये पराभव झालेल्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) काल शनिवारी राजस्थान रॉयल्सविरोधात (Rajasthan Royals) विजयाचं खातं उघडलं. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर विरुद्ध (RCB) गुजरात टायटन्समध्ये (Gujrat Titans) झालेल्या लढतीत पुन्हा एकदा राहुल तेवतीयाने चमकदार कामगिरी करत गुजरातला विजय मिळवून दिला. दरम्यान, आज रविवारीही डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये (Lucknow super giants) पहिला सामना रंगणार आहे. आज दुपारी साडेतीन वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली आणि लखनऊ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh pant) आणि लखनऊचा के एल राहुल (k l rahul) यंदाच्या आयपीएल हंगामात दुसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या दिल्ली आणि लखनऊच्या लढतीत दिल्लीचा पराभव झाला होता. त्यामुळे आज पुन्हा एकदा दोन्ही संघ मैदानात उतरणार असून दिल्लीचा ऋषभ पंत लखनऊसंघाचा बदला घेतो का ? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

kl rahul And Rishabh pant
The King is Back ! विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर चाहत्यांमध्ये संचारला उत्साह

...तर लखनऊचा 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याचा मार्ग होणार सुकर

लखनऊ सुपर जायंट्सने आज होणाऱ्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास गुणतालिकेत १४ गुण प्राप्त करुन दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. त्यामुळे लखनऊ संघाचा प्ले ऑफच्या सिमेवर जाण्याचा प्रवास अधिक सोपा होईल. १६ गुण मिळाल्यावर टीमचं प्ले ऑफमध्ये जाणं जवळपास निश्चितच मानलं जातं. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकला तर दिल्ली १० गुणांवर पोहचून टॉप ५ मध्ये आपली जागा पक्की करेल.

दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेईंग ११

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, रोवमॅन पॉवेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्ताफिजुर रहमान आणि खलील अहमद.

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), मार्कस स्टॅयनिस, क्रुणाल पांड्या, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवि बिश्नोई, मोहसिन खान आणि आवेश खान.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.