
David warner: येत्या ३१ मार्चपासून आयपीएल २०२३ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धा तोंडावर असताना सर्व संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत.
भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज आणि दिल्लीचा रिषभ पंत हा आगामी आयपीएल स्पर्धा खेळताना दिसून येणार नाहीये.
काही महिन्यांपूर्वी त्याच्या कारचा अपघात झाला होता. त्यामुळे तो आणखी काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी दिल्लीचे सूत्र कोण सांभाळणार? असा प्रश्न उपस्थित होत होता.
आता आगामी हंगाम सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने एक मोठी घोषणा केली आहे. आयपीएलच्या १६ व्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. (Latest sports updates)
यापूर्वी त्याने आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचे देखील नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्याला नेतृत्व करण्याचा चांगलाच अनुभव आहे.
आयपीएल २०१६ स्पर्धेत त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाचे सूत्र सांभाळताना आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले होते.
मात्र गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याला ६.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते.
या संघाचे कर्णधारपद डेव्हिड वॉर्नरकडे तर उपकर्णधारपद अक्षर पटेलला देण्यात आले आहे. सध्या अक्षर पटेल देखील जोरदार कामगिरी करतोय.
नुकताच झालेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत त्याची ऑलराऊंड कामगिरी पाहायला मिळाली होती . तसेच त्याला आयपीएल स्पर्धेत देखील खेळण्याचा दांडगा अनुभव आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.