Devon Conway: मैं नहीं तो 'कॉनव्हे', तूफान फटकेबाजी करत CSK साठी केली खास कामगिरी

Devon Conway Batting: तुफानी अर्धशतक झळकावणारा डेवोन कॉनव्हे देखील एका खास कामगिरीमुळे चर्चेत आला आहे.
devon conway
devon conwaysaam tv

KKR VS CSK IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३३ वा सामना बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजांना चोपलं आणि चेन्नईच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या फलंदाजांना रोखलं.

यासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने या सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवला आहे. या सामान्याचा हिरो अजिंक्य रहाणे ठरला. मात्र तुफानी अर्धशतक झळकावणारा डेवोन कॉनव्हे देखील एका खास कामगिरीमुळे चर्चेत आला आहे.

devon conway
Sachin Tendulkar Birthday: सचिनसोबत घडला होता विचित्र प्रसंग! डायपर लावून मैदानात उतरला अन् ठोकल्या 97 धावा..

न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज डेवोन कॉनव्हे हा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खेळताना जोरदार कामगिरी करतोय. त्याने या हंगामात आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात डेवोन कॉनव्हेने ४० चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी केली.

हे त्याचे आयपीएल २०२३ स्पर्धेतील सलग चौथे अर्धशतक आहे. यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील त्याने तुफानी खेळी करत अर्धशतक झळकावले. (Latest sports updates)

devon conway
Sachin Tendulkar House: 100 कोटींच्या अलिशान बंगल्यात राहतो सचिन तेंडुलकर',पाहा घराच्या आतील फोटो

सलग ४ अर्धशतके..

डेवोन कॉनव्हे या हंगामातील ७ सामन्यांमध्ये ५२.३३ च्या सरासरीने ३१४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ५६ धावांची खेळी केली. तर सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ५७ चेंडूंमध्ये ७७, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ४५ चेंडूंमध्ये ८३ आणि राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३८ चेंडूंचा सामना करत ५० धावांची खेळी केली होती.

चेन्नईचा जोरदार विजय..

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनव्हेने चांगली सुरुवात करून देत ५६ धावा केल्या. तर शिवम दुबेने ५० धावा केल्या.

या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर ४ गडी बाद २३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून जेसन रॉयने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने नाबाद ५३ धावा केल्या. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघ विजयापासून ४९ धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com