महेंद्रसिंग धोनीचा आज शेवटचा आयपीएल सामना? चर्चांना उधाण

MS Dhoni Last IPL Match : आज चेन्नईचा सामना राजस्थान रॉयल्स संघासोबत (CSK Vs RR) होणार आहे.
MS Dhoni
MS Dhoni Saam Tv

मुंबई: आयपीएलच्या (IPL 2022) इतिहासात चारवेळा चॅंम्पियनपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ (CSK) आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सुरूवातीला रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई संघाने यंदाच्या हंगामात खराब कामगिरी केली. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांत फक्त 4 विजय मिळवले आहेत. तर तब्बल 9 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, आज चेन्नईचा सामना राजस्थान रॉयल्स संघासोबत (CSK Vs RR) होणार आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईचा हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी सुद्धा पुढच्या आयपीएलमध्ये दिसणार की नाही? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

MS Dhoni
भारताची 'गोल्डन गर्ल' बॉक्सर निखात झरीन कोण आहे? तिच्याबद्दल जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 68 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जची (CSK) लढत राजस्थान रॉयल्स (RR) संघाविरुद्ध होणार आहे. मुंबईतील ऐतिहासिक ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीवर असतील, जो या हंगामातील शेवटचा सामना खेळणार आहे. धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असू शकतो, असा अंदाज सोशल मीडियावर लावला जात आहे.

तसं पाहता धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, आता तो फक्त आयपीएल खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही. 40 वर्षीय धोनी देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू असण्यासोबतच जागतिक स्तरावरचा आयकॉन देखील आहे.

MS Dhoni
IPL 2022 Play Off : दोन स्थानांसाठी आता तीन संघांमध्ये टक्कर, वाचा सविस्तर माहिती

धोनीच्या नेतृत्वात चेन्नई 4 वेळा चॅंम्पियन

एमएस धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकून दिली आहे. याशिवाय धोनीच्या नेतृत्वात 5 वेळा चेन्नई संघाने उपविजेतेपद देखील पटकावले आहे. एवढेच नाही तर धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने 2010 आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदही जिंकले होते. धोनीने आतापर्यंत 233 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये 39.30 च्या सरासरीने 4952 धावा केल्या आहेत. ज्यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 135 झेल आणि 39 स्टंपिंग केले आहेत. धोनीशिवाय, दिनेश कार्तिक हा एकमेव यष्टिरक्षक आहे ज्याने आयपीएलमध्ये 150 हून अधिक खेळाडूंना बाद केलं आहे.

धोनीचा आज शेवटचा सामना?

यावर्षी आयपीएल हंगामात जेव्हा धोनीने रवींद्र जडेजाकडून कर्णधारपद स्वीकारले तेव्हा त्याला विचारण्यात आले की तो 2023 मध्ये सीएसकेकडून खेळणार का? यावर धोनी म्हणाला होता, 'तुम्ही मला पिवळ्या जर्सीत नक्कीच पाहाल, पण जर्सीचा रंग कसा असेल यावर काही सांगता येत नाही.' त्याच्या या विधानावरून धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असा अंदाज चाहते लावत आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com