
SRH VS RCB IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज आणखी एक निर्णायक सामना रंगणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर आजचा सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा चान्स वाढणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पाहा कशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११.
वनिंदूं हसरंगा आणि जोश हेजलवूड दुखपतीमुळे बाहेर असल्यामुळे मायकेल ब्रेसवेल आणि वॅन पार्नेलला संधी दिली गेली होती. आज होणाऱ्या सामन्यात जोश हेजलवूड आणि वनिंदूं हसरंगा खेळणार का, याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाहीये.
जर हसरंगा फिट असेल तर तो संघात कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. तर सतत फ्लॉप ठरत असलेल्या दिनेश कार्तिकला या सामन्यात बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्याच्या ऐवजी सुयश प्रभूदेसाई आणि केदार जाधवला संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघात देखील बदल केला जाऊ शकतो. सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माला बाहेर बसावं लागू शकतं. त्याच्याऐवजी मयांक अगरवालला संधी दिली जाऊ शकते. तसेच उमरान मलिक आणि हॅरी ब्रुकचे देखील कमबॅक होऊ शकते.
अशी असू शकते दोन्ही संभावित संघांची प्लेइंग ११
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरर, मायकेल ब्रेसवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर)/सुयश प्रभूदेसाई , वेन पारनेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि कर्ण शर्मा.
सनरायझर्स हैदराबाद:
अनमोलप्रीत सिंग, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार ), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, मार्को जानसेन, फजलहक फारुकी, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.