ऊसतोड कामगाराचा आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटर पर्यंतचा प्रवास; पाहा Video

परिस्थितीवर मात करून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर, एका तरुण ऊसतोड कामगाराने, दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत जागतिक स्तरावर नाव कमावले आहे.
ऊसतोड कामगाराचा आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटर पर्यंतचा प्रवास; पाहा Video
ऊसतोड कामगाराचा आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटर पर्यंतचा प्रवास; पाहा VideoSaam Tv

बीड: परिस्थितीवर मात करून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर, एका तरुण ऊसतोड कामगाराने, दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. पायाने दिव्यांग असतानाही आई-वडिलांना मदत म्हणून, तो उस तोडी करायचा आणि त्याच बरोबर आपलं स्वप्न साकार करण्यासाठी तो खेळ देखील खेळायचा. आता हाच ऊसतोड कामगार असणारा तरुण, भारताचा क्रिकेट संघामध्ये सामील झाला आहे. हे करत असताना आणि धनुर्विद्या स्पर्धेत देखील गोल्डमेडिलिस्ट असतांना, त्याचा जगण्याचा संघर्ष कायम सुरूच आहे.

बीडच्या केज (Beed Kej) तालुक्यात असणार्‍या डोणगाव येथे ज्योतीराम घुले (Cricketer Jyotiram Ghule) राहतात. ज्योतीरामचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले, तर उच्च शिक्षण बीडमध्ये झाले. घरी केवळ तीन एकर शेती, त्यामुळे आई-वडील ऊस तोडणी ला जात होते, त्यावरच कुटुंबाचा गाडा चालायचा. तर घरची परिस्थिती हलाखीची असल्याने, ज्योतीरामला देखील वयाच्या दहाव्या वर्षीच हाती कोयता घ्यावा लागला. आई-वडिलांना मदत म्हणून तो ऊस तोडणीसाठी जात होता. तीन वर्ष ऊसतोड कामगार म्हणून त्यांनी काम देखील केलं. त्यानंतर कापूस केंद्रावर मजुरी देखील केली आणि हे काम करत असताना, त्याने धनुर्विद्या सह आपला क्रिकेटचा छंद देखील जोपासला.

2008 ला त्याने क्रिकेटच्या करिअरला सुरुवात केली. यादरम्यान ज्योतीरामने 2010 ला ओरिसा येथे झालेल्या, राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत गोल्ड मेडल देखील प्राप्त केले. मात्र राष्ट्रीय संघांमध्ये खेळताना, नॅशनल किट घेण्यासाठी पाच लाख रुपये नसल्यानं, त्याला धनुर्विद्याचे स्वप्न साकार करता आलं नाही. यादरम्यान यष्टीरक्षक व फलंदाज असणाऱ्या या ज्योतीरामची राज्यस्तरावर निवड झाली. ज्योतीरामने आतापर्यंत जिल्ह्याचे एक ना अनेक वेळा प्रतिनिधित्व केले असून महाराष्ट्र संघाचे पाच वेळा कर्णधारपदी त्याने भूषवले आहे. त्यांनतर 2018 पासून त्याची भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्याला दोन वर्ष स्पर्धा खेळता आली नाही. मात्र येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात हैदराबाद येथे होणाऱ्या, भारत विरुद्ध बांगलादेश या स्पर्धेत तो भारताकडून खेळणार आहे.

याविषयी ज्योतीरामच्या आई म्हणाल्या, की ऊस तोडणी, रोजगार करून, ज्योतीरामचं शिक्षण केलं. मुंबई-पुण्याला देखील काम केलं. मात्र त्याच्या शिक्षणासाठी मागे सरकलो नाहीत. माझे पतीचं आठ वर्षांपूर्वी निधन झाले, मात्र तरी देखील मी मागे सरकले नाही. "पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा" या म्हणी प्रमाणे, माझ्या मुलांने देखील शिवाजी राजा सारखं काम करून नाव कमवावं, हीच माझी अपेक्षा आहे. असं म्हणत असताना ज्योतीराम आई चंद्रभागा यांना अश्रू अनावर झाले.

ऊसतोड कामगाराचा आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटर पर्यंतचा प्रवास; पाहा Video
भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड थांबली; आता 'कांस्य'ची अपेक्षा

तर याविषयी ज्योतीराम म्हणाले, की हे सगळं करत असताना आर्थिक बाब ही सर्वात मोठी असते. 2010 साली मी धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक मारलं आणि भारतीय संघामध्ये सामील झालो. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते सोडावं लागलं. हे माझ्या क्रिकेटच्या बाबतीत होऊ नये, यासाठी मी संज्योती लाकडी तेल घाणा या नावाने व्यवसाय सुरू केला. कारण प्रत्येक माणसाला कुटुंबाची जबाबदारी असते, आणि ही जबाबदारी आणि खेळ पार पाडायचा असेल, तर आपलं आर्थिक पाठबळ खूप गरजेचं असतं. प्रत्येक वेळी आपण इतरांपुढे हात पसरवण्यापेक्षा या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये, मी हा व्यवसाय सुरू केला आहे. यामुळं माझं कुटुंब तर चालत आहेचं मात्र माझ्या क्रिकेट मधील करिअर देखील पूर्ण होत आहे.

दरम्यान ज्याला लहानपणापासून तरूण वयापर्यंत, दिव्यांग म्हणून साऱ्यांनी हिणवलं. त्याच ज्योतीराम घुलेनी जिल्हा, राज्य, देश पातळीवर आपलं नाव कोरलं आहे. दिव्यांग असूनही त्यांनी कायम संघर्ष करत, आपली वाट सुकर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला साथ मिळत आहे. ती, त्याच्या कुटुंबासह मित्र परिवाराची. येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात तो हैदराबाद येथे भारताकडून बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान दिव्यांग नसूनही जिद्दीच्या बळावर त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. यामुळं या ध्येयवेड्या तरुणाचा संघर्ष कधी संपणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com