INDvsENG: मालिकेवर कोरोनाचे सावट; इंग्लंड बोर्डाचे 1024 कोटी धोक्यात
INDvsENG: मालिकेवर कोरोनाचे सावट; इंग्लंड बोर्डाचे 1024 कोटी धोक्यातTwitter/ @ECB

INDvsENG: मालिकेवर कोरोनाचे सावट; इंग्लंड बोर्डाचे 1024 कोटी धोक्यात

सदस्य पॉझिटीव्ह आल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाची झोप पूर्णपणे उडाली आहे.

INDvsENG: पाकिस्तानविरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी संघाचे 7 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) असल्याचे आढळले होते. सदस्य पॉझिटीव्ह आल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाची झोप पूर्णपणे उडाली आहे. ईसीबीला चिंता पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेची नसून भारता विरुद्धच्या सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेची आहे. या मालिकेसाठी, जव इंग्लंडचे 137 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1024 कोटी) धोक्याक आहेत .

यामुळेच पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या इंग्लंड-भारत मालिकेपूर्वी ईसीबी एक कोरोना लसीकरण कार्यक्रम करणार आहे. 7 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर इंग्लंडला पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेपूर्वी नवीन संघ निवडावा लागला. यामुळे इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर बेन स्टोक्सला संघाचा नवा कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे.

INDvsENG: मालिकेवर कोरोनाचे सावट; इंग्लंड बोर्डाचे 1024 कोटी धोक्यात
Tokyo Olympics: 'सोने की चिडिया' असलेल्या भारताचा 'सुवर्ण' इतिहास तोकडाच!

ईसीबीचे लक्ष सध्या भारतीय संघाचे खेळाडूंवर आहे. कसोटी मालिका पुर्ण होई पर्यंत भारतीय खेळाडू सुरक्षित राहावे, त्यांना कुठलिही ईजा पोहाचू नये, त्यांना कोरोनापासून कसे दूर ठेवता येईल याकडे इंग्लंड बोर्डाचे लक्ष आहे. माध्यमांच्या अहवालानुसार भारताच्या इंग्लंड दौर्‍यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्याचे ईसीबीचे लक्ष्य आहे.

भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचे प्रसारण, ब्रॉडकास्टिंग आणि तिकीट यांचे मिळून सुमारे १३७ दशलक्ष डॉलर्स मिळण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे या मालिकेवर परिणाम झाला तर इंग्लंडला मोठा तोटा होईल. या मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघाला आयपीएल खेळण्यासाठी युएईला जावे लागणार आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com