ENGvsIND: आक्षेपार्ह वक्तव्याने वादात सापडलेल्या खेळाडूची इंग्लिश ताफ्यात वर्णी

भारत आणि इंग्लंड (ENGvsIND) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे.
ENGvsIND: आक्षेपार्ह वक्तव्याने वादात सापडलेल्या खेळाडूची इंग्लिश ताफ्यात वर्णी
ENGvsINDTwitter/ @ECB

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. बुधवारी पहिल्या दोन सामन्यांसाठी यजमानांनी आपल्या संघाची घोषणा (England Team) केली आहे. संघाची कमान नियमित कर्णधार जो रूट (Joe Root) वरती आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान वादात सापडलेला ऑली रॉबिन्सन (Ollie Robinson) पुन्हा संघात परतला आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) संघात समावेश केलेला नाही.

इंग्लंड क्रिकेट संघाच्या निवड समितीने बुधवारी भारत विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहिर केला आहे. अष्टपैलू बेन स्टोक्ससह जोस बटलर, जॉनी बेअरस्टो आणि सॅम कुरन हे संघात परतले आहेत. दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत स्टोक्स खेळला नाही. तो पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने वापसी केली होती.

ENGvsIND
ENGvsIND: आक्षेपार्ह वक्तव्याने वादात सापडलेल्या खेळाडूची इंग्लिश ताफ्यात वर्णी

भारताविरद्धच्या सामन्यासाठी पहिल्या दोन कसोटींसाठी 17 खेळाडूंचा संघ तयार केला आहे. परंतू यामध्ये अनेक मोठे खेळाडू बाहेर आहेत. यामध्ये जोफ्रा आर्चर आणि क्रिस वोक्स यांना संघात स्थान देणायत आलेले नाही. दोन्ही देशांमधील पहिला कसोटी सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंघॅममध्ये खेळला जाईल. दुसरा सामना लंडनमध्ये 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान खेळला जाणार आहे. तिसरा कसोटी सामना लीड्समध्ये 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल. चौथ्या सामन्यात दोन्ही संघ लंडनमध्ये 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल. मालिकेचा शेवटचा आणि पाचवा सामना मँचेस्टरमध्ये 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

ENGvsIND
पाहा Video: क्रिक्रेट सामन्यात राडा! लाथाबुक्क्या अन् बॅटने हाणामारी

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ

जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रोली, सॅम कुरन, हबीब हमीद, डेन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, मार्क वुड

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com