T-20 मध्ये 'युनिव्हर्स बॉसचा' धमाका; केली विश्वविक्रमाची नोंद
T-20 मध्ये 'युनिव्हर्स बॉसचा' धमाका; केली विश्वविक्रमाची नोंद Twitter/ @ICC

T-20 मध्ये 'युनिव्हर्स बॉसचा' धमाका; केली विश्वविक्रमाची नोंद

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात विंडीज संघाने ऑस्ट्रेलियाला 6 विकेटने पराभूत करून तिसरा सामना जिंकला आहे.

युनिव्हर्स बॉस (Univers Boss) म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने (Chris Gayle) वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया (WI vs AUS) यांच्यातील तिसर्‍या टी -20 सामन्यात आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. ख्रिस गेल टी -20 क्रिकेटमध्ये 14,000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने (Aron Finch) पुन्हा एकदा नाणेफेक जिंकला. पण यापूर्वी त्याने मागील दोन सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय फसला होता. म्हणून त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 141 धावा करू शकला. हेनरिक्सने संघासाठी 33 धावा केल्या.

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात विंडीज संघाने ऑस्ट्रेलियाला 6 विकेटने पराभूत करून तिसरा सामना जिंकला आहे. यासह वेस्ट इंडीजने या मालिकेत 3-0 अशी अतुलनीय आघाडी घेतली आहे. पहिल्या टी -२० सामन्यात वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाला 18 धावांनी पराभूत केले, दुसर्‍या सामन्यात 56 धावांनी तर तिसर्‍या सामन्यात 6 विकेट्सने.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 141 धावा केल्या. दुसरीकडे वेस्ट इंडिजकडून ख्रिस गेलच्या तुफानी डावामुळे हे लक्ष्य अवघ्या 14.5 षटकांत 4 गडी गमावून गाठले गेले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये ख्रिस गेलला जास्त काही करामत दाखवता आली नाही. परंतु तिसर्‍या सामन्यात तो पुन्हा एकदा आपल्या जुन्या शैलीत दिसला. त्याने 38 चेंडूत 67 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने 7 षटकार आणि 4 चौकार लगावले.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com