Faf du Plessis Record: डू प्लेसिसचा नावाला साजेसा विक्रम! RR विरुद्ध २१ धावा करताच IPL स्पर्धेतील मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

Fastest To Score 4000 Runs In IPL: फाफ डू प्लेसिसच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
faf du plessis
faf du plessissaam tv

RR VS RCB IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर सुरु असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

faf du plessis
IPL 2023 Points Table: गुजरातला मागे सोडत CSK करणार Playoff मध्ये प्रवेश?पाहा काय आहे समीकरण

फाफ डू प्लेसिसच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद..

नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची जोडी मैदानावर आली होती.

दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. ५० धावसंख्येवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पहिला विकेट पडला. विराट कोहली १८ धावा करत माघारी परतला. तर दुसरीकडे फाफ डू प्लेसिस डाव पुढे घेऊन जात होता.

दरम्यान त्याने आयपीएल कारकिर्दीतील ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो आयपीएल स्पर्धेत ४ हजार धावा पूर्ण करणारा १५ वा फलंदाज ठरला आहे. तर सर्वात जलद ४ हजार धावा पूर्ण करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वात जलद ४ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम हा केएल राहुलच्या नावे आहे. त्याने १०५ इनिंगमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. (Latest sports updates)

faf du plessis
WATCH IPL: भडकलेल्या हैदराबादच्या फॅन्सने दिले कोहली... कोहलीचे नारे; LSG च्या खेळाडूंवर फेकले नट बोल्ड -VIDEO

आयपीएल स्पर्धेत सर्वात जलद ४ हजार धावा पूर्ण करणारे फलंदाज..

१०५- केएल राहुल

११२- ख्रिस गेल

११४ - डेव्हिड वॉर्नर

१२१ - फाफ डू प्लेसिस

१२८- विराट कोहली

१३१- एबी डीव्हीलियर्स

faf du plessis
IPL 2023 : रोहित शर्मासाठी 'करो या मरो'ची लढाई; मुंबई इंडियन्स मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

या सामन्यात अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com