Virat Kohli News: सरावादरम्यान टिप्स दिलेल्या फॅनकडून विराटला खास भेट! BCCI ने शेअर केला व्हिडिओ

Fan Gifts Bat To Virat Kohli: विराटने टिप्स दिल्यानंतर फॅनने विराटला बॅट गिफ्ट केली आहे.
Fan Gifts Bat To Virat Kohli
Fan Gifts Bat To Virat Kohlisaam tv/bcci

Virat Kohli, Asia Cup 2023:

भारतीय संघातील खेळाडू आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील सामने खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. रविवारी कोलंबोच्या मैदानावर भारत- पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून आले आहेत.

यादरम्यान विराट कोहली युवा खेळाडूंना टिप्स देताना दिसून आला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात एक युवा फॅन विराटला चांदीची बॅट भेट म्हणून देताना दिसून येत आहे.

Fan Gifts Bat To Virat Kohli
Asia Cup 2023: ..तर पाकिस्तान थेट फायनल गाठणार! पावसामुळे सर्व सामने रद्द झाल्यास कसं असेल समीकरण? जाणून घ्या

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा अनेकदा युवा खेळाडूंना मदत करताना दिसून आला आहे. यावेळी देखील सरावादरम्यान तो युवा खेळाडूंना टिप्स देताना दिसून आला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात विराटने टिप्स दिल्यानंतर, युवा खेळाडू विराटचं गुणगान गाताना दिसून येत आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडिओच्या शेवटी युवा क्रिकेट फॅनने विराटला चांदीची बॅट भेट म्हणून दिली आहे. (Latest sports updates)

पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी विराटचा कसून सराव..

भारतीय संघ पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहली नेट्समध्ये घाम गाळताना दिसून आला आहे.

भारत- पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ चा सामना कोलंबोच्या मैदानावर रंगणार आहे.या सामन्यात विराट कोहलीवर मोठी जबाबदारी असणार आहे. विराट या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल डावाची सुरूवात करताना दिसून येऊ शकतात. या दोघांवर संघाला चांगली सुरूवात करून देण्याची जबाबदारी असणार आहे.

साखळी फेरीतील सामन्यांमध्ये जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते त्यावेळी भारतीय संघाने २६६ धावा केल्या होत्या. मात्र चिंतेची बाब अशी की, भारतीय संघाचा टॉप ऑर्डर या सामन्यात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता. त्यामुळे भारतीय संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, तर टॉप ऑर्डरला टिचून फलंदाजी करावी लागणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com