IPL 2022: मलिकने टाकला सर्वात वेगवान चेंडू; तरीही पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या नंबर 1

उमरान मलिकने सामन्यात 154 किमी प्रति तास वेगाने एक चेंडू फेकला.
IPL 2022: मलिकने टाकला सर्वात वेगवान चेंडू; तरीही पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या नंबर 1
Umran MalikSaam TV

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या 46 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला (SRH) भलेही पराभव पत्करावा लागला असेल, परंतु या सामन्यात त्यांचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) पुन्हा एकदा लोकांना आश्चर्यचकित केले. उमरान मलिकने सामन्यात 154 किमी प्रति तास वेगाने एक चेंडू फेकला. हा चेंडू यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. उमरानने लॉकी फर्ग्युसनला मागे टाकले ज्याने 153.9 च्या गतीने चेंडू टाकला होता. उमरान हा या स्पर्धेत सर्वात वेगवान गोलंदाजी करणारा भारतीय ठरला आहे, तरीही तो चार वेगवान गोलंदाजांच्या मागे आहे. आयपीएलच्या इतिहासातील चार वेगवान चेंडू फेकलेले गोलंदाज कोण आहेत ते जाणून घ्या.

शॉन टेट

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. 2011 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना टेटने 157.7 किमीच्या वेगात चेंडू टाकला होता. अॅरॉन फिंच त्यावेळी फलंदाजी करत होता. 11 वर्षांनंतरही टेटचा विक्रम जशास तसा आहे.

Shaun Tait
Shaun Tait Saam TV

एनरिक नॉर्टेजे

शॉन टेटचा विक्रमाच्या सर्वात जवळ एनरिक नॉर्टजे पोहोचला होता. IPL 2020 मध्ये नॉर्टजेने 156.2 किमीच्या वेगात चेंडू टाकला होता. दिल्ली कॅपिटल्सच्या या गोलंदाजाने हा चेंडू राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरला टाकला होता, ज्यावर त्याने स्कूप शॉट खेळून चौकार ठोकला होता. याशिवाय नॉर्टजेने 155.21, 154.74 आणि 154.21 किमी प्रतितास या वेगाने चेंडू फेकले आहेत.

anrich nortje
anrich nortjeSaam TV

डेल स्टेन

सनरायझर्स हैदराबादचा सध्याचा गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन यानेही उमरान मलिकच्या गतीएवढा वेगवान चेंडू टाकला होता. डेल स्टेनने 2012 साली डेक्कन चार्जर्सकडून खेळताना 154.40 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.

dale steyn
dale steynSaam TV

कगिसो रबाडा

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा यानेही 154.23 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला आहे. रबाडाने आयपीएलच्या इतिहासात 16 वेळा 150 किमीच्या वेगाने चेंडू टाकला आहे.

Kagiso Rabada
Kagiso RabadaSaam TV

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.