Lionel Messi : स्वप्न पूर्ण झालं...फीफा वर्ल्डकप जिंकला आता मेस्सीनं घेतला यू-टर्न; जगभरातील फुटबॉलप्रेमी हैराण

मेस्सीने स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर त्याने आपल्या निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
Lionel Messi/@FIFAWorldCup/Twitter
Lionel Messi/@FIFAWorldCup/TwitterSAAM TV

Lionel Messi : फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना काल लुसेल स्टेडीयम येथे पार पडला. या सामन्यात फ्रांस आणि अर्जेंटीना हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात अर्जेंटीना संघाने पेनल्टी शूटआउट मध्ये ३-२ ने बाजी मारत सामना आपल्या नावावर केला. यासह अर्जेंटीना संघाचे तिसऱ्यांदा तर संघातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीचे पहिल्यांदा फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. यापूर्वी फिफा विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर लिओनेल मेस्सी निवृत्ती घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र या स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर त्याने आपल्या निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (FIFA)

Lionel Messi/@FIFAWorldCup/Twitter
ARG vs FRA : मेस्सी जैसा कोई नहीं... फायनलमध्ये गोल डागताच विक्रमाला गवसणी

हा रोमहर्षक सामना ३-३ च्या बरोबरीत समाप्त झाला होता. त्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये सामन्याचा निकाल अर्जेंटीना संघाच्या बाजूने लागला. या सामन्यात देखील अर्जेंटीना संघाकडून लिओनेल मेस्सीने आपला अनुभव पणाला लावून २ महत्वपूर्ण गोल केले. वयाच्या ३५ व्या वर्षी लिओनेल मेस्सी आपला शेवटचा सामना खेळतोय असे अनेक फुटबॉल चाहत्यांना वाटले असावे. मात्र सामना झाल्यानंतर त्याने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याने निवृत्ती न घेता आपल्या राष्ट्रीय संघासाठी विश्वविजेता खेळाडू म्हणून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  (FIFA World Cup 2022)

अंतिम सामना झाल्यांनतर लिओनेल मेस्सी म्हणाला की, "नक्कीच, मला या विजयासह माझी कारकीर्द समाप्त करायची होती. मला आणखी काहीच नकोय. याप्रकारे कारकीर्दीचा शेवट करणे नक्कीच आनंददायी आहे. यापुढे काय? असं विचारलं तर माझ्यासमोर कोपा अमेरिका आणि विश्वचषक आहे. मला फुटबॉल आवडतं. राष्ट्रीय संघाचा भाग असल्याचा मला आनंद आहे. माझी अशी इच्छा आहे की, राष्ट्रीय संघासाठी मी विश्वविजेता खेळाडू म्हणून आणखी काही सामने खेळावे. तसेच तो पुढे म्हणाला की,"हे केवळ एक स्वप्न असाव जे सत्यात उतरले आहे. मला हे मिळवण्याची खूप इच्छा होती. तसेच मला खात्री होती की, परमेश्वर मला ही भेट नक्की देणार."

Lionel Messi/@FIFAWorldCup/Twitter
Argentina Win FIFA WC 2022: अर्जेंटिनाचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! मेस्सीचं स्वप्न पूर्ण, फ्रान्सची कडवी झुंज

लिओनेल मेस्सीने हे वक्तव्य केल्यानंतर अर्जेंटीना संघाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की," त्याला संघासाठी खेळायचं असल्यास तो खेळू शकतो. त्याला आमच्यासोबत राहायचं आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे." लिओनेल मेस्सीने आतपर्यंत आपल्या कारकिर्दीत एकूण ७ वेळेस बॅलन डी'ओर पुरस्कार पटकावला आहे. तर बार्सिलोना संघासाठी खेळताना त्याने ४ वेळेस चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

मेस्सीच्या कारकिर्दितील विशेष कामगिरी?

>> बॅलन डी'ओर पुरस्कार - ७ (२००९,२०१०,२०११,२०१२,२०१५,२०१९,२०२१)

>> आंतराष्ट्रीय गोल्डन बूट - १( कोपा अमेरिका)

>> आंतराष्ट्रीय गोल्डन बॉल्स - ४ (२०१४ विश्वचषक, २०१५ कोपा अमेरिका, २०२१ कोपा अमेरिका, २०२२ फिफा विश्वचषक)

>> UEFA चॅम्पियन्स लीग- ४ (२००६ ,२००९, २०११, बार्सिलोना संघासाठी)

>> विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद - १ ( २०२२ फिफा विश्वचषक)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com