पाहा Video: क्रिक्रेट सामन्यात राडा! लाथाबुक्क्या अन् बॅटने हाणामारी

सोशियल मीडियावरती हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.
पाहा Video: क्रिक्रेट सामन्यात राडा! लाथाबुक्क्या अन् बॅटने हाणामारी
पाहा Video: क्रिक्रेट सामन्यात राडा! लाथाबुक्क्या अन् बॅटने हाणामारीSaam Tv

क्रिकेट हा चांगल्या लोकांचा खेळ (Gentleman's Game) असं म्हटलं जातं. हा खेळ संयमाचा आणि शिस्तीचा आहे असेही म्हटले जाते. पण अनेक वेळा संयम सुटतो आणि नियमांचे उल्लंघन केले जाते. दोन खेळाडू आमने-सामने आले तर थोडी फार तु तु मे मे होते. परंतू संपुर्ण संघच जर आमने-सामने आला तर तूफान हाणामारी होते. क्रिक्रेट खेळात मर्यादा ओलांडून भाडणं झालेली आपण अनेकदा पाहिले आहे. या साऱ्या मर्यांदा तोडून पाकिस्तानमध्ये एका क्रिकेट सामन्यात चक्क बॅटने आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.

काही दिवसांपूर्वीच क्रिकेट सारख्या संयमी खेळाला गालबोट लावणारी घटना घडली. १८ जुलै रोजी युकेच्या मेडस्टोनमधील मोट पार्क क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेट सामना सुरू होता. पैसा गोळा करण्याच्या दृष्टीने मैत्रिपूर्ण स्वरूपाचा हा सामना खेळला जात होता. सामन्याच्या शेवटच्या क्षणी एक वाद झाला आणि तो इतका टोकाला गेला हाणामारी झाली. सामन्याच्या निर्णायक वेळेत दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना बॅटने, लाथांनी, बुक्क्यांनी, स्टंपने बेदम चोप दिला.ृ

क्रिकेटच्या मैदानावरचा हा संपुर्ण राडा तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. सध्या हा व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अगोदर काही खेळाडूंमध्ये बाचाबाची झालेले पाहायला मिळत आहे. त्यानंतर एक खेळाडू बॅट घेऊन पळत येतो आणि विरोधी संघाच्या खेळाडूला मारहाण करायला सुरुवात करतो. या खेळाडूंचे वाद सोडवण्यासाठी काही लोक मैदानात येतात व्हिडीओत दिसतात पण तरीही हे खेळाडू शांत बसायतं नाव घेत नाहीत. या खेळाडूंचं असं विचित्र कृत्य क्रिक्रेट खेळाला काळीमा फासण्याचे का केले आहे. हे क्रिकेटविश्वाला लाजवणारं आहे अशी भावना नेटिझन्सने व्यक्त केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com