बिहारमध्ये 'या' प्रकरणात महेंद्रसिंह धोनीविरोधात गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

महेंद्रसिंह धोनीसह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh DhoniSaam Tv

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. धोनीसह इतर ७ जणांविरोधात बिहारमधील बेगुसराय पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर हे प्रकरण न्यायदंडाधिकारी अजय कुमार मिश्रा यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात न्यू ग्लोबल प्रोड्यूस इंडिया लिमिटेड नावाची कंपनी सामील आहे, या कंपनीची जाहिरात महेंद्रसिंह धोनी करत होता. (Mahendra Singh Dhoni Latest News)

Mahendra Singh Dhoni
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक; अशी आहे ताजी आकडेवारी

सोमवारी बेगुसरायच्या सीजेएम न्यायालयात एसके एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीने एफआयआर दाखल केला. प्रकरण ३० लाख रुपयांच्या बाऊन्स झालेल्या चेकशी संबंधित आहे, हा चेक न्यू ग्लोबल प्रोड्यूस इंडिया लिमिटेडने एसके एंटरप्रायझेसला दिला होता. या कंपनीची जाहिरात महेंद्रसिंह धोनीने केली होती.

एसके एंटरप्राइझेसला न्यू ग्लोबल प्रोड्यूस इंडिया लिमिटेडकडून खतांसाठी ३० लाख रुपयांची ऑर्डर मिळाल्याची माहिती आहे. डीलरने पूर्वीच्या कराराचे पालन केले नाही, परिणामी खतांचा मोठा साठा विकला नाही. कंपनीने उर्वरित उत्पादने परत घेतली. त्या बदल्यात एजन्सीला ३० लाख रुपयांचा धनादेशही दिला. धनादेश बँकेत जमा केला असता तो बाऊन्स झाला.

Mahendra Singh Dhoni
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या मनात आहे तरी काय ? 'या' ट्विटमुळं संभ्रम

एसके एंटरप्राइझने न्यू ग्लोबल प्रोड्यूस इंडिया लिमिटेडला कायदेशीर नोटीस पाठवली. पण कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर एसके एंटरप्राइझचे मालक नीरज कुमार निराला यांनी न्यू ग्लोबल प्रोड्यूस लिमिटेड तसेच आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि इतर ७ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला.

आयपीएलमध्ये रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सोडले. त्याेवळी धोनीने (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद स्वीकारले, पण संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. ४ वेळचा चॅम्पियन संघ अजूनही फायनल मध्ये गेला नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com