'मला अक्षरश: कपडे काढून मारलं अन् फेकून दिलं'; माजी क्रिकेटपटूने सांगितली 'ती' भयंकर घटना

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिलने १५ महिन्यांपूर्वी झालेल्या अपहरणाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
Cricket ground
Cricket ground saam Tv

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी क्रिकेटपटू (Cricketer) स्टुअर्ट मॅकगिलने १५ महिन्यांपूर्वी झालेल्या अपहरणाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे स्टुअर्टच्या चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे. मॅकगिलचे गेल्या वर्षी अपहरणकर्त्यांच्या एका गटाने त्याच्या सिडनी येथील घराजवळून अपहरण केले होते. बंदूकीचा धाक दाखवून स्टुअर्टचे अपहरण (Kidnapping) केले होते. (former australian cricketer stuart mcgill News In Marathi )

Cricket ground
व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करायचा; महिला क्रिकेटपटूच्या आरोपानंतर प्रशिक्षकावर मोठी कारवाई

स्टुअर्टच्या अपहरणकर्त्यांनी वेगळाचा दावा केला आहे. त्यामुळे स्टुअर्टच्या अपहरण प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अपहरणकर्त्या दोन भावांनी दावा केला आहे की, स्टुअर्ट मॅकगिल हा स्वत: आमच्यासोबत आला होता. मात्र, या प्रकरणावर मॅकेगिलने निर्दोष असल्याचा दावा केला होता. त्याने त्यावेळी अनेक प्रकारे त्रास दिला, त्यानंतर फेकून देण्यात आले असे स्टुअर्ट यांनी सांगितले.

Cricket ground
Ind Vs SA: बेंगळुरूत होणार फैसला, टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची मोठी संधी

मॅकगिलने एका वृत्त संस्थेला सांगितले की, अशी घटना शत्रूसोबत देखील घडू नये. मी अपहरणकर्त्यांना मला घेऊन जाण्यास तीव्र विरोध केला. मात्र त्यांनी बंदूकीचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांनी रात्री अंधारात मला एका कारला बांधले. माझ्याशी संवाद साधत अपहरणकर्ते म्हणाले की, 'आम्ही जाणतो की, तुम्ही यात सामील नाही आहात. आम्हाला फक्त तुमच्याशी संवाद साधायचा आहे'. त्यानंतर त्यांनी मला कारमध्ये बसवले. तब्बल दीड तास कारमध्ये बसवले.

पुढे मॅकगिल म्हणाला की, मला माहित नव्हते की, मी कुठे आहे आणि मला कुठे नेले जात आहे. मी त्यावेळी खूप घाबरलो होतो. काही वेळाने मला माझ्या अंगावरील कपडे काढून मारहाण केली. मला धमक्या देण्यात आल्या.त्यानंतर मला फेकून दिले. संपूर्ण घटना तीन तासाच्या आत संपली'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com