Ab De Villiers on Team India: टीम इंडिया वर्ल्डकप खेळणार, पण चिंता एबी डिव्हिलियर्सला, म्हणाला, एकाच गोष्टीची...

Ab De Villiers on Team India: दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने भारतीय क्रिकेट संघावर मोठं भाष्य केलं आहे.
Ab De Villiers on Team India
Ab De Villiers on Team IndiaSaam tv

Ab Be Villiers on Team India:

क्रिकेट विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. क्रिकेट विश्वचषक जवळ आल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा वाढू लागली आहे. याचदरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने भारतीय क्रिकेट संघावर मोठं भाष्य केलं आहे. एबी डिव्हिलियर्सने भारतीय क्रिकेट संघाबाबत चिंता व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, ' क्रिकेट विश्वचषकसाठी खेळणारा भारतीय क्रिकेट संघ खूपच चांगला आणि मजबूत आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा तर उप कर्णधार हार्दिक पंड्या आहे. मात्र, मला भारतीय संघाच्या मायदेशातील मैदानावर खेळण्याविषयी चिंता वाटत आहे'.

Ab De Villiers on Team India
India vs Pak:भारतीय फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर का ठरतात अपयशी? भारतीय सलामीवीरानं सांगितलं कारण

'भारतीय संघ गेल्या वेळी देखील खेळला होता, त्यावेळी संघ जिकंला होता. यंदा टीम इंडियाला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळताना प्रचंड दबाव असणार आहे. माझ्या मते हाच मोठा अडथळा वाटत आहे, एबी डिव्हिलियर्सने एका यूट्युब चॅनलवर सांगितले. २०११ साली यशाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्न टीम इंडियाचा असेल. यावेळी बोलताना एबी डिव्हिलियर्स टीम इंडियाला सल्ला देखील दिल्ला आहे.

एबी डिव्हिलियर्स टीम इंडियाला सल्ला देताना म्हणाला की,' टीम इंडियाने घाबरून जाऊ नये. बेधडकपणे खेळावे. मला नेमक्या शब्दात हेच मांडायचं आहे. देशाच्या दबावाला विसरून जा. त्याला तुम्ही त्याचं नियंत्रण करू शकत नाही. तुम्ही नियंत्रण ज्याच्यावर करू शकता, त्यावर नियंत्रण ठेवा. टीम इंडियाने तसं केलं तर पुढे जाऊ शकतो. तर भारतीय संघ क्रिकेट विश्वचषक जिंकू शकतो'.

Ab De Villiers on Team India
World Cup 2023: बड्या बड्या बाता...ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणतो भारत नव्हे तर 'हे' संघ २ जाणार वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

सूर्यकुमार यादवचं कौतुक करताना एबी डिव्हिलियर्स म्हटला की, 'तुम्हाला माहीत आहे की, मी सूर्यकुमार यादवचा खूप मोठा चाहता आहे. मी जसा खेळायचो, तसाच तो खेळताना दिसतो. मात्र, त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये विशेष कामगिरी अजून काही जमली नाही'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com