IPL Points Table: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

IPL Playoffs Prediction: चला तर पाहूया ५५ व्या सामन्यानंतर कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती.
IPL Playoffs
IPL PlayoffsSaam tv

IPL 2023 Predictions: आयपीएल २०२३ स्पर्धा आता महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आता सर्व संघ केवळ प्लेऑफमध्ये प्रवेश कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करताना दिसून येत आहे. बुधवारी चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार विजय मिळवला यासह पॉईंट्स टेबलमध्ये आपली स्थिती मजबूत केली आहे. तर पराभूत झालेला दिल्लीचा संघ सर्वात शेवटी कायम आहे. चला तर पाहूया ५५ व्या सामन्यानंतर कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती.

IPL Playoffs
IPL 2023 Cheerleaders: आता तर हद्दच पार! सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाने चियर लीडर सोबत केलं लाजिरवाणं कृत्य ; VIDEO व्हायरल

टॉप ४ मध्ये कोण?

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने या हंगामात जोरदार कामगिरी केली आहे. या संघाने ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत. १६ गुणांसह हा संघ अव्वल स्थानी आहे. तर १५ गुणांसह चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या स्थानी आहे. चेन्नईचा एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

त्यामुळे चेन्नईला १ गुण दिला गेला होता. अन्यथा चेन्नई आणि गुजरात १६ गुणांनी बरोबरीत असते. तर मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कमबॅक करत १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत खेळणारा लखनऊ सुपर जायंट्स संघ ११ गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहे.

IPL Playoffs
MI VS RCB Turning Points: मुंबईने चूक केली पण आरसीबीला संधी साधता आली नाही? हे होते MI vs RCB सामन्यातील टर्निंग पॉइंट

कोणते ४ संघ करणार प्लेऑफमध्ये प्रवेश?

गुजरात टायटन्स संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची शक्यता ९९.४% इतकी आहे. गुजरातचे अजून ३ सामने शिल्लक आहेत.

तर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरू शकतो. या संघाची शक्यता ९८% इतकी आहे. तर ५ वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची शक्यता ६१% आहे. तसेच लखनऊ सुपर जायंट्स संघाची शक्यता ४४% इतकी आहे. (Latest sports updates)

IPL Playoffs
MI vs RCB Match Result: सूर्याच्या वादळात उडाला आरसीबीच्या स्वप्नांचा पालापाचोळा; वानखेडेवर मुंबईचा दणक्यात विजय

उर्वरित संघांना किती संधी?

राजस्थान रॉयल्स संघ देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शर्यतीत आहे. या संघाची प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची शक्यता २५ % इतकी आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाची शक्यता २३%, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची शक्यता २२%, पंजाब किंग्ज संघाची शक्यता १४%, सनरायझर्स हैदराबाद संघाची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता १३% आणि दिल्ली कॅपिटल्स संघाची शक्यता २% म्हणजे नाहीच्या बरोबर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com