T 20 World Cup : विराट कोहली करणार ओपनिंग; चर्चा सुरू होताच गौतम गंभीर रोखठोक बोलला

रोहित शर्मासोबत सलामीला विराट कोहली येणार असल्याच्या चर्चेला उधाण आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Virat Kohli latest Update
Virat Kohli latest Update SAAM TV

Virat Kohli in T 20 World Cup | मुंबई: आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीला सूर गवसला. याच स्पर्धेत त्यानं शतक ठोकून 'दुष्काळ' संपवला. त्यानंतर टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत के.एल. राहुलऐवजी विराट कोहलीनं सलामीला यावं, अशी जोरदार चर्चा सुरू झाली.

विराट कोहलीनं (Virat Kohli) सलामीला यावं, या संभाव्य योजनेशी काही माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटविश्वातील तज्ज्ञ मंडळी सहमत आहेत. तर काहींना हा प्लान मूर्खपणाचा वाटतोय. भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि विस्फोटक फलंदाज गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) तर असा काही प्लान असेल तर तो मूर्खपणाचाच आहे, असं थेट बोलूनही टाकलं. विराट कोहली सलामीला येण्याचा प्रश्नच नाही. या प्लानवर चर्चा करण्यातही काही अर्थ नाही, असे गंभीरला वाटतं.

Virat Kohli latest Update
दिग्गज क्रिकेटपटू असलेल्या विमानाच्या इंजिनात झाला बिघाड; त्यानंतर...

गौतम गंभीरने क्रमांक तीनवर फलंदाजीसाठी दोन खेळाडू दावेदार असल्याचेही सांगितले. गरजेनुसार त्यांना संधी दिली जाऊ शकते, असे तो म्हणाला. कोहलीनं सलामीला यायला हवे, ही चर्चा बकवास आहे. विराट कोहलीने के. एल. राहुल किंवा रोहित शर्मासोबत सलामीला येऊच नये. याबाबत मी जाहीररित्याही बोललो आहे. यावर चर्चा करण्यासारखे काहीच नाही. तिसरं स्थान हे फ्लेक्सिबल ठेवेल, असं मतही त्याने व्यक्त केले.

सलामीवीर जर १० षटके खेळून काढत असतील तर, सूर्यकुमारला फलंदाजीसाठी पाठवेल. जर विकेट लवकर बाद झाला तर, मी कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवेल, असेही गंभीरने सांगितले.

Virat Kohli latest Update
Sanju Samson : संजू सॅमसन भारताचा कर्णधार, BCCI ने घेतला मोठा निर्णय

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यानेही गंभीरच्या मताचे स्वागत केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी विराट कोहलीला पाहू इच्छितो. फिरकीपटूला खेळताना तो थोडा अडखळतो, पण वेगवान गोलंदाजीविरुद्ध तो चांगला खेळतो. टीम इंडियातील टॉप ४ खेळाडू हे फिक्स आहेत असं मला वाटतं, असे हेडन म्हणाला.

दुसरीकडे माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने वेगळे मत मांडले आहे. विराट कोहली सलामीला आल्यास टीममध्ये समतोल साधला जाईल. क्रिकबझशी बोलताना पार्थिव म्हणाला की, माझ्या मते विराट कोहलीने डावाची सुरुवात करायला हवी. कोहली आणि रोहित शर्मा हा वेगवेगळ्या शैलीचे फलंदाज आहेत. एक खूपच आक्रमक आहे, जो सुरुवातीपासूनच चौकार-षटकार मारू शकतो आणि दुसरा कोहली आहे, तो गॅप शोधून चौकार लगावतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com