Glenn Maxwell: मॅक्सवेल कुटुंबात चिमुकल्याची एन्ट्री! पत्नीने पोस्ट शेअर करत दिली बातमी

Glenn Maxwell Become Father: मॅक्सवेल कुटुंबात चिमुकल्याचं आगमन झाल्याची बातमी ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे
Glenn Maxwell Become Father
Glenn Maxwell Become FatherSaam tv

Glenn Maxwell Become Father:

ऑस्ट्रेलिया संघातील अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आनंदाची बातमी दिली आहे. त्याची पत्नी विनी रमनने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मॅक्सवेल कुटुंबात चिमुकल्याचं आगमन झाल्याची बातमी ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागली आहे.

Glenn Maxwell Become Father
IND vs BAN, Asia Cup 2023: बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात रोहितने जिंकला टॉस; टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये ५ मोठे बदल

ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी मॅक्सवेल ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यात विनी आणि ग्लेन मॅक्सवेलसह चिमुकल्याचा हात असल्याचे दिसून येत आहे. या पोस्टला कॅप्शन देत तिने ११:०९:२०१३ | लोगान मेवरीक मॅक्सवेल..असं लिहिलं आहे.

या बाळाचं नाव लोगान मेवरीक मॅक्सवेल असं ठेवण्यात आलं आहे. या पोस्टवर क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने देखील कमेंट करत या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच भारतीय संघातील खेळाडू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने ग्लेन मॅक्सवेल आणि विनीला शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागली आहे. या पोस्टला आतापर्यंत ८ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केली आहे. (Latest sports updates)

ग्लेन मॅक्सवेलची कारकिर्द...

ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलिया संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याने १२८ वनडे सामन्यांमध्ये ३४९० धावा केल्या आहेत.

यादरम्यान गोलंदाजी करताना त्याने ६० गडी बाद केले आहेत. तर टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं तर त्याने ९८ टी-२० सामन्यांमध्ये २१५९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना त्याने ३९ गडी बाद केले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com