Ind vs Pak: नामिबिया टी-ट्वेंटी मालिकेसाठी भारताची टीम फायनल; पाक टीमशी रंगणार सामना

Global T20 Namibia 2022 : भारताकडून बंगाल क्रिकेट संघ खेळणार आहे, तर पाकिस्तानकडून लाहोर कलंदर्स हा संघ ग्लोबल टी-ट्वेंटी नामिबिया २०२२ मध्ये खेळणार आहे.
Global T20 Namibia 2022
Global T20 Namibia 2022Saam TV

मुंबई: भारतीय क्रिकेट (Cricket) चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नामिबियाने एक T20 टूर्नामेंट आयोजित केली आहे, ज्यामध्ये खेळण्यासाठी भारतालाही (India Vs Pakistan Cricket Match) निमंत्रण देण्यात आले आहे. भारताकडून बंगाल क्रिकेट संघ खेळणार आहे, तर पाकिस्तानकडून पाकिस्तान सुपर लीगचा लाहोर कलंदर्स हा संघही ग्लोबल टी-ट्वेंटी नामिबिया २०२२ मध्ये (Global T20 Namibia 2022) खेळणार आहे. यादरम्यान भारत आणि पाकिस्तानचा संघ यांच्यात सामना रंगणार आहे. (Cricket News Global T20 Namibia 2022)

हे देखील पाहा -

चार देशांच्या टीम्समध्ये होणार स्पर्धा

क्रिकेट वेबसाइट ESPN-Cricinfo च्या रिपोर्टनुसार, T20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आणि स्वतःची परिक्षा घेण्यासाठी, नामिबिया क्रिकेट बोर्डाने सप्टेंबरमध्ये चार टीम्सची T20 मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान याशिवाय यजमान नामिबियाकडून आणि दक्षिण आफ्रिकेकडून प्रत्येकी एक संघ बोलावण्यात आला आहे. भारताकडून बंगाल क्रिकेट संघाला या सामन्यासाठीचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे, जे बंगालच्या क्रिकेट असोसिएशनने देखील स्वीकारले आहे आणि या स्पर्धेसाठी संघाची घोषणाही करण्यात आली आहे.

भारताने जाहीर केली टीम

द क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (The Cricket Association of Bengal - CAB) चे प्रमुख अविशेक दालमिया यांना नामिबियाने क्रिकेट आयोजकांनी संपर्क साधून या टी-ट्वेंटी मालिकेत सहभागी होण्याची विनंती केली होती. CAB ने यासाठी सहमती दर्शवली आणि आता त्यानुसार १६ प्लेयर्सच्या टीमची घोषणाही करण्यात आली आहे, ज्यांचे कर्णधारपद अभिमन्यू ईश्वरनकडे सोपवण्यात आले आहे. बंगालच्या या टीममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या शाहबाज अहमद, आकाश दीप या खेळाडूंचाही या संघात समावेश आहे. बंगालच्या क्रिकेट टीमसाठी ही मालिका वर्ल्डकपच्या तयारीसाठीदेखील चांगली संधी आहे, कारण साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्षाच्या अखेरीस सय्यद मुश्ताक अली ही देशांतर्गत हंगाम T20 टूर्नामेंटने सुरू होत आहे.

Global T20 Namibia 2022
खुशखबर! भारतात लवकरच लॉंच होणार हायड्रोजनवर चालणारी बाईक; वाहन कंपनीची मोठी घोषणा

पीएसएल चॅम्पियन्सही मैदानात

पाकिस्तानच्या टीमबद्दल बोलायचे झाले, तर पाकिस्तान सुपर लीग फ्रँचायझी लाहोर कलंदर्स यात सहभागी होणार आहे. PSL 2022 च्या चॅम्पियन लाहोरने यासाठी सहमतीही दर्शवली आहे. तथापि, शाहीन आफ्रिदी, फखर जमान, मोहम्मद हाफीज यांसारखे नामवंत पाकिस्तानी खेळाडू आणि संघातील अनेक परदेशी खेळाडू या स्पर्धेत खेळतील अशी शक्यता नाही. फ्रेंचायझी एक प्रतिनिधी संघ पाठवेल, ज्यात कलंदर संघात देशांतर्गत पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा समावेश असेल. या स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेतून कोणत्या संघाचा समावेश होणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com