Neeraj Chopra News: नीरज चोप्रा 400 दिवसांपूर्वी जे बोलला ते शेवटी करून दाखवलं

Neeraj Chopra News In Marathi: नीरज चोप्राने ४०० दिवसांपूर्वीच पदक जिंकणार असल्याची भविष्यवाणी केली होती.
Neeraj Chopra news
Neeraj Chopra newssaam tv

Neeraj Chopra Latest News In Marathi:

भारताच्या गोल्डन बॉयने जग जिंकलं आहे. नुकताच पार पडलेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक इव्हेंटमध्ये नीरजने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने अंतिम फेरीत ८८.१७ मीटर भाला फेकून हे पदक पटकावले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची मान अभिमानाने उंचावणारा नीरज चोप्राने ४०० दिवसांपूर्वीच पदक जिंकणार असल्याची भविष्यवाणी केली होती.

Neeraj Chopra news
World Athletics Championships: भारतीय पोरांचं जग जिंकण्याचं स्वप्न हुकलं! 4x400 इव्हेंटच्या फायनलमध्ये भारताच्या पदरी निराशा

तर झाले असे की, नीरज चोप्रा जेव्हा शेवटच्या वेळी या स्पर्धेत उतरला होता. त्यावेळी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तसेच अंतिम फेरी सुरु असताना तो दुखापतग्रस्त देखील झाला होता.

त्यामुळे त्याचं सुवर्णपदकाचं स्वप्न हुकलं होतं. मात्र रौप्य पदकावर समाधान मानत त्याने देशाला वचन दिलं होतं की, २०२३ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत मी आणखी चांगली कामगिरी करेल. त्याने आपलं वचन पूर्ण केलं आहे.

गेल्यावेळी त्याने ८८.१३ मीटर थ्रो करत त्याने रौप्यपदकाला गवसणी घातली होती. यावेळी त्याने ८८.१७ मीटर भाला फेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंतिम फेरीत पात्र ठरण्यासाठी त्याने ८८.७७ मीटर भाला फेकला होता.

या सुवर्ण कामगिरीसह नीरज चोप्रा हा वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरणारा पहिलाच भारतीय पहिलाच भारतीय ठरला आहे. तर वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा तो दुसराच भारतीय ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम अभिनव बिंद्राच्या नावे होता. (Latest sports updates)

Neeraj Chopra news
Arshad Nadeem Statement: 'भारत आणि पाकिस्तान जगात एक...',पराभूत झालेल्या अरशद नदीमचं मन जिंकणारं वक्तव्य

भारताकडून नीरज चोप्राने सुवर्णपदतकाची कमाई केली. तर काही खेळाडूंचं पदक जिंकण्याचं स्वप्न हुकलं आहे.

भारताकडून अमोज जेकब, राजेश रमेश, मोहम्मद अनस याहिया आणि मोहम्मद अजमल वरियाथोडी यांनी 4x400 रिले धावण्याच्या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत भारतीय संघाच्या पदरी निराशा पडली आहे.

कारण भारतीय संघ ५ व्या स्थानी राहिला आहे. तर धावपटू पारूल चौधरीने ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडत ११ वे स्थान पटकावले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com