MI vs GT Head to Head: गुजरातविरुद्धच्या सामन्याआधी मुंबईसाठी गुड न्यूज; यंदाही प्ले-ऑफचं तिकीट पक्कं?

MI vs GT Head to Head: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ५७ वा सामना आज रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स संघात होणार आहे.
MI vs GT IPL Head to Head
MI vs GT IPL Head to HeadSaam TV

MI vs GT Head to Head: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ५७ वा सामना आज रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स संघात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सायंकाळी ७ वाजता या सामन्याला सुरूवात होईल. आजचा सामना मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत महत्वाचा आहे. (Latest sports updates)

कारण, गुजरातविरुद्धचा विजय मुंबईला प्ले-ऑफचं तिकीट मिळवून देऊ शकतो. त्यामुळे या सामन्यात नेमकं काय होणार? याकडेच क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. अशातच सामना सुरू होण्यापूर्वी मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

MI vs GT IPL Head to Head
IPL 2023 : रोहित शर्मासाठी 'करो या मरो'ची लढाई; मुंबई इंडियन्स मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ११ सामने खेळले असून यातील ६ सामन्यात विजय तर ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या मुंबईचा संघ १२ गुणांसह गुणालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारा गुजरातचा संघ यंदाही प्ले-ऑफच्या शर्यतीत आहे.

गुजरातने यंदाच्या हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळले असून यातील ८ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. गुजरातचा संघ सध्या १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. जर गुजरातने आजचा सामना जिंकला, तर यंदाच्या हंगामात प्ले-ऑफ गाठणारा तो पहिला संघ असेल.

मुंबई विरुद्ध गुजरात हेड-टू-हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघ फक्त दोन वेळाच आमने-सामने आले आहेत. यातील एका सामन्यात मुंबईने तर एका सामन्यात गुजरातने विजय मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईने गुजरातला गेल्या हंगामात पराभूत केलं होतं. तर गुजरातने मुंबईला यंदाच्या हंगामात पराभूत केलेलं आहे.

MI vs GT IPL Head to Head
Yashasvi Jaiswal Success Story : जयस्वालच्या यशस्वी खेळीचं रहस्य उघड! मुंबईपासून ५० किमी दूर दडलंय तरी काय?

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारा गुजरातचा संघ यंदाही जोरदार फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईसाठी यंदाचा हंगाम 'कभी खुशी कभी गम' असाच राहिलेला आहे. कारण, त्यांचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरा हा दुखापतीमुळे आधीच स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यापाठोपाठ जोफ्रा आर्चरला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.

वानखेडेवर मुंबईचा रेकॉर्ड जबरदस्त

मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, आजचा सामना हा मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. वानखेडे मैदानावर मुंबईचा रेकॉर्ड खुपच चांगला आहे. मुंबईने यंदाच्या हंगामात वानखेडेवर ६ सामने खेळले असून यातील ४ सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे.

वानखेडे मैदान हा मुंबईचा गड मानला जातो. या मैदानावर सूर्यकुमार यादव, इशान किशन, रोहित शर्मा यांचे रेकॉर्ड खूपच खास आहे. त्यामुळे जर हा गड भेदायचा असेल, तर हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सला विशेष कामगिरी करावी लागणार आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com