
Gujarat Titans vs Mumbai Indians Qualifier 2 : पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर-2 चा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरातने शुभमन गिलच्या वादळी खेळीच्या जोरावर 233 धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिलने अवघ्या 49 चेंडूत या हंगामातलं तिसरं शतक ठोकलं.
प्रथम फलंदाजीसाठी उतरेल्या गुजरातच्या रिद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर रिद्धिमान सहा बाद झाला पण शुभमन गिलने साई सुदर्शनसोबत मिळून स्कोअरबोर्ड धावता ठेवला. शुभमन गिलने 60 चेंडूत 129 धावांची वादळी खेळी केली.
शुभमन गिलच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकात 3 बाद 233 धावांचा डोंगर उभारला. गिलशिवाय रिद्धिमान साहाने 18, साई सुरर्शन 43, हार्दिक पांड्या 28 आणि राशिद खानने 5 धावा केल्या. मुंबईकडून आकाश मढवालने 1 आणि पियुष चावलाने 1 विकेट घेतली. आता मुंबईसमोर विजयासाठी 234 धावांचं आव्हान आहे.
या शुभमन गिलने तुफान फटकेबाजी करत आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. या स्पर्धेत त्याने ३ शतके झळकावली आहे. यासह आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम हा विराट कोहली आणि जोस बटलरच्या नावे आहे. विराट कोहली आणि जोस बटलर यांनी प्रत्येकी ४-४ शतके झळकावली आहेत. आता शुभमन गिलने ३ शतके झळकावली आहेत. (Latest sports updates)
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन (Gujarat Titans Playing XI) :
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन (Mumbai Indians Playing XI) :
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी. (Latest Sports News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.